Ukraine drone attack on Russia : युक्रेन आणि रशिया यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान युक्रेनने रशियाच्या आतमध्ये खोलवर सायबेरिया येथील एका महत्त्वाच्या हवाई तळाला लक्ष्य केले आहे. या ड्रोन हल्ल्यात न्यूक्लियर केपेबल बॉम्बर विमानांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याला शत्रूच्या लांब पल्ल्याच्या विमानांना नष्ट करण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेचे वर्णन ‘लार्ज-स्केल स्पेशल ऑपरेशन’ असे करण्यात आले आहे, वृत्तसंस्था रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

युक्रेनच्या सुरक्षा क्षेत्रातील रॉयटर्सला सांगितेल की, Irkutsk Oblast येथील बेलाया हवाई तळावर करण्यात आलेल्या कॉर्डिनेटेड ड्रेन स्ट्राईकदरम्यान ४० पेक्षा जास्त रशियन लष्करी विमानांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे रशियाचा हा हवाई तळ युक्रेनच्या सीमेपासून ४,३०० किलोमीटर आतमध्ये आहे.

नाव न देण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी आणखी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेनच्या डोमेस्टीक सेक्युरिटी एजन्सी एसबीयूने हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यादरम्यान TU-95 आणि TU-22 बॉम्बर्सना लक्ष्य करण्यात आले. ही विमाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठी वापरण्यात आली होती.

“रशियामध्ये मोठ्या प्रमाणात शत्रूचे स्टॅटर्जीक बॉम्बर्स जळत आहेत,” असे एसबीयूने एका निवेदनात म्हटले आहे, ज्याबरोबर एक व्हिडिओ दखील शेअर करण्यात आला असून यामध्ये स्फोट आणि घटनास्थळावरून धूर निघत असल्याचे दिसून येत आहे.

बेलाया एअरबेस हा स्रेडनी या पूर्व सायबेरीयामधलील गावात आहे आणि येथे TU-22M लाँग रेंज सुपरसॉनिक बॉम्बर्स ठेवण्यात आली होती. Irkutskचे गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह यांनी युसोल्स्की जिल्ह्यातील लष्कराच्या युनिटवर ड्रोन हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र त्यांनी लष्करी विमानांबद्दल कुठलेही भाष्य केले नाही.

टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फुटेजमध्ये ड्रोन्सचा आवाज ऐकू येत आहे. तसेच आकाशात धुराचे लोट उठताना पाहायला मिळत आहेत. कोब्झेव्ह म्हणाले की, या भागात अशी पहिलीच घटना होती आणि ड्रोन ट्रकमधून सोडण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनमधील सूत्रांनी बीबीसीला माहिती दिली की, या हल्ल्यांमध्ये रशियन स्ट्रॅटेजिक एव्हिएशनचे आणखी एक केंद्र असलेल्या Murmansk एअरबेसलाही लक्ष्य करण्यात आले. रशियन माध्यमांनी या भागात ड्रोन हल्ला झाल्याचे म्हटले आहे.