केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतेच लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
Union Minister Ananth Kumar passed away at the age of 59, in Bengaluru last night. #Karnataka
Bengaluru: #Visuals from the residence of Union Minister Ananth Kumar who passed away at the age of 59, last night. #Karnataka pic.twitter.com/M5iDx1iXQD
— ANI (@ANI) November 12, 2018
पंतप्रधान मोदी शोक व्यक्त करताना म्हणाले की, अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी आपल्या युवा काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.
Extremely saddened by the passing away of my valued colleague&friend,Shri Ananth Kumar Ji.He was a remarkable leader, who entered public life at young age & went on to serve society with utmost diligence&compassion.He will always be remembered for his good work: PM Narendra Modi pic.twitter.com/uHRiXAkgzL
— ANI (@ANI) November 12, 2018
त्याचबरोबर, संरक्षमंत्री निर्मला सितारामण यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या निधनाने पक्षामध्ये दुःखद वातावरण आहे. त्यांनी भाजपाची मोठी सेवा केली. बंगळूरू त्यांना नेहमीच आपल्या हृदयात आणि स्मरणात ठेवेल.
Deep sense of grief on hearing that Shri Ananth Kumar is no more with us. Served BJP all along. Bengaluru was in his head and heart, always. May God give his family the strength to bear with this loss: Defence Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/iH9cwHGaqS
— ANI (@ANI) November 12, 2018
आमचे वरिष्ठ सहकारी अनंत कुमार यांच्या निधनाची बातमी ही खूपच दुःखद बातमी आहे. ते अनुभवी संसदपटू होते, देशाची त्यांनी पूर्ण क्षमतेनं सेवा केली. लोकांसाठी काम करण्याची त्यांची निष्ठा आणि आवड होती. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सामील आहे.
Absolutely shocked&pained by demise of very senior colleague&a friend Shri Anant Kumar ji. He was a seasoned parliamentarian who served nation in several capacities. His passion&devotion for welfare of people was commendable. My condolences to his family: Home Min Rajnath Singh pic.twitter.com/ZUp5othvGB
— ANI (@ANI) November 12, 2018
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अनंत कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने कर्नाटकातील जनतेचे आणि देशाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, सहकार्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
Sad to hear of the passing of Union Minister&veteran parliamentarian Shri H.N. Ananth Kumar. This is a tragic loss to public life in our country&particularly for the people of Karnataka. My condolences to his family, colleagues and countless associates: President Ram Nath Kovind pic.twitter.com/GyOCHTmFms
— ANI (@ANI) November 12, 2018