केंद्र सरकारनं नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करत फेरबदल केले. त्यात काही जणांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. तर काही जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. राजीव चंद्रशेखर यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना तंत्रज्ञान राज्यमंत्रिपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार हा वाद उभा राहिला आहे. राजीव चंद्रशेखर यांनी आपलं यूजरनेम बदललं होतं. यापूर्वी राजीव चंद्रशेखर यांचं ट्विटर हँडल Rajeev MP या नावाने होतं. त्यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर Rajeev GOI असं करण्यात आलं आहे. त्यामुळे हे ब्लू टिक गेल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरच्या व्हेरिफिकेशन पॉलिसीतही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही खातेधारक आपल्या खात्यावरील नाव बदलत असेल. तर त्याच्या नावासमोरील ब्लू टिक काढण्यात येईल. त्याचबरोबत खातं ६ महिने वापरलंच गेलं नाही, तरी ब्लू टिक हटवण्याचा नियम आहे. मात्र असं असलं तरी राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर खात्यावर लवकर ब्लू टिक दिलं जाईल असं सांगण्यात आलं आहे.

करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिग्विजय सिंह यांच्यासहित २०० जणांविरोधात FIR दाखल

यापूर्वी दिल्ली हायकोर्टानं ट्विटरला फटकारलं होतं. त्यानंतर नव्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असं ट्विटरकडून कोर्टात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ट्विटरने रविवारी तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या पदाची विनय प्रकाश यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनय प्रकाश यांना grievance-officer-in@twitter.com वर तक्रारी पाठवू शकता.

ट्विटरवर ब्लू टिकला इतकं महत्त्व का? पाहा व्हिडिओ


नव्या आटी कायद्यानुसार नियम २०२१ च्या कलम ४(ड) अंतर्गत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्विटरला भारतातील खातेधारकांच्या तक्रारींचा एक मासिक अहवाल प्रसिद्ध करणं अनिवार्य आहे. त्यात तक्रारींचं काय झालं? याबाबत माहिती देणं आवश्यक आहे.

More Stories onएक्सTwitter
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister rajeev chandrashekhar lost blue tick on twitter rmt
First published on: 12-07-2021 at 14:28 IST