Union Territory tops highest daily wage chart : भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आर्थिक स्थितीचा आढाला धेतल्यानंतर वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी तफावत दिसून येते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) आकडेवारीनुसार, देशाचे सरासरी दैनंदिन वेतन १०७७ रुपये इतके आहे. असे असले तरी औद्योगिकीकरण आणि शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये हे वेतन यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
जसे की सराकरी कार्यालये, आर्थिक संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये एका जागी एकवटल्याने या यादीत दिल्ली सर्वात पुढे आहे, येथे सरासरी दैनंदिन वेतन हे १३४६ रुपये इतके आहे. याच्यानंतर लागूनच कर्नाटक (१२९६ रुपये) आणि महाराष्ट्र (१२३१ रुपये) क्रमांक येतो. यामधून तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात बंगळुरू आणि मुंबईचं वाढतं महत्त्व लक्षात येते.
२०२५ मध्ये सर्वाधिक सरासरी दैनिक वेतन असलेली टॉप १० राज्ये पुढीलप्रमाणे आहेत-
१. दिल्ली- १३४६ रुपये
२. कर्नाटक- १२६९ रुपये
३. महाराष्ट्र- १२३१ रुपये
४. तेलंगणा- ११९२ रुपये
५. हरियाणा- ११५४ रुपये
६. तामिळनाडू- १११५ रुपये
७. गुजरात- १०७७ रुपये
८. उत्तर प्रदेश- १०३८ रुपये
९. आंध्र प्रदेश – १००० रुपये
१०. पंजाब- ९६२ रुपये
उद्योगीकरण, आर्थिक विविधता आणि कौशल्य रचना यात असलेल्या फरकामुळे ही तफावत दिसून येते. दिल्ली ही गुरुग्राम आणि नोएडाच्या जवळ आहे, याचा जास्त वेतन मिळण्यासाठी फायदा होतो . तर कर्नाटकचा तंत्रज्ञान क्षेत्राचं नेतृत्व बंगळूरु करते, येथे कुशल कामगारांना येथे प्रिमियम वेतन मिळते. महाराष्ट्राला मुंबई आणि पुणे या शहरांकडून उत्पादन , फायनान्स आणि मनोरंजन या क्षेत्रांचा आधार मिळतो.
तेलंगणा, तमिळनाडू आणि हरियाणा यासारख्या राज्य त्यांचे फार्मा, आयटी आणि ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सातत्याने वाढवत आहेत, ज्यामुळे त्यांच्या शहरी भागात वेतनात वाढ होत आहे. तर दुसरीकडे अनेक ग्रामीण आणि पूर्वेकडील भाग या बाबतीत मागे पडतात, जिथे इनफॉर्मल लेबर आणि शेतीवर अवलंबून असल्याने वेतन कमी मिळते.
