हुंड्यात मोटारसायकल दिली नाही म्हणून सासरच्या लोकांनी एका २१ वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे २१ व्या शतकातही मुंलीचा हुंड्यासाठी केला जाणारा छळ थांबला नसल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मोटारसायकल दिली नाहीतर सासरचे लोकं मला मारतील, असं मृत विवाहितेने आपल्या वडिलांना सांगितलं होत. त्यानंतर काही दिवसात तिचा मृतदेह एका नाल्याजवळ आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरिया येथे एका नवविवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह एका झुडपात फेकून काही आरोपी फरार झाले. तर हुंड्यात दुचाकी न दिल्यामुळे सासरच्या लोकांचा राग आला होता आणि त्या रागातून या मुलीची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे तर सासरच्या फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

सोमवारी गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार्दगोनिया गावातील नाकटा नाल्याजवळच्या झुडपात एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला, त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तर ट्रॅक्टरमधून आलेल्या काही लोकांनी हा मृतदेह झाडीत फेकून ते पळून गेल्याचं काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेची माहिती मृत महिलेचा भाऊ रतन चौहान याला पोलिसांना त्याच्या बहिणीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मृतदेह पाहिला आणि तो आपल्या बहिणीचा असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर रतन चौहान यांने त्याच्या बहिणीचा पती दुर्गेश आणि सासऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात बहिणीचा हुंड्यासाठी छळ करुन तिची हत्या केल्याची तक्रार दाखल केली.

‘बाबा मला हे लोकं मारुन टाकतील’

हेही वाचा- माणूस नव्हे हैवान! कुत्र्यांच्या नवजात पिल्लांना जिवंत जाळलं आणि पिल्लांच्या आईला…

मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी अर्चना हिचा विवाह १२ मे २०२२ रोजी बांकी गावातील रहिवासी दुर्गेश चौहान याच्याशी लावून दिला होता. शिवाय लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी मुलीला माहेरुन मोटरसायकल आणण्यासाठीचा तगादा लावला होता. यासाठी ते तिचा छळ देखील करत होते. त्या लोकांनी तिला बेदम मारहाण देखील केली होती.

हेही वाचा- पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड

मुलीच्या मृत्यूच्या २५ दिवस अगोदरच मुलीचे वडील तिच्या घरी गेले असता, मुलीने तिला झालेला त्रास सांगितला आणि रडू लागली. हुंडा म्हणून मोटारसायकल दिली नाही तर सासरचे लोक मला जीवे मारतील, असंही तिने आपल्या वडिलांना सांगितलं होतं. यानंतर पीडीत मुलीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना मोटारसायकल देण्यास आपण सक्षम नाही. त्यामुळे माझ्या मुलीचा छळ करू नका अशी हात जोडून विनवणी केली होती. पण वडील तेथून परतल्यानंतर सासरच्या मंडळीने मुलीची हत्या केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व प्रकरणाचा पुढील तपास रुद्रपूरचे सीओ पंचम लाल करत असून त्यांनी सांगितलं की, ‘मृत विवाहितेचा सहा महिन्यांपुर्वी विवाह झाला होता, मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.’