शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपांवरुन तुम्ही वाहनात इंधन भरल्यानंतर निश्चिंत होत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, उत्तर प्रदेशातील काही पेट्रोल पंपांवर बनावट पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तेल माफिया आणि पोलिसांच्या संगनमताने हा प्रकार खुलेआम सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, पर्दाफाश करण्यात आलेल्या टोळीकडून थिनर, सॉल्वंट आणि रंग यांचा वापर करुन केवळ प्रतिलिटर ३८ रुपयांत असे बनावट पेट्रोल आणि डिझेल तयार केले जात होते. हे बनावट इंधन तेल माफिया मेरठ शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर आणि दुकांनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देत होते. मोठ्या टँकर्समधून इथे तयार झालेले बनावट पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत होता. धक्कादायक बाब म्हणजे तेल माफियांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांचीही साथ असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…

राजीव जैन आणि प्रदीप गुप्ता या दोन तेल माफियांकडे केमिकल आणि थिनरचे परवाने आहेत. याचा गैरवापर करुन हे दोघे बनावट पेट्रोल आणि डिझेल तयार करीत होते. गेल्या दहा वर्षांपासून या तेल माफियांचा हा काळा धंदा सुरु होता. प्रदीप गुप्ताने परतापूरच्या डुंगरावली गावातील औद्योगिक वसाहतीत गणपती पेट्रो नावाने कारखाना सुरु होता. तर राजीव जैन याने वेदव्यासपुरी येथे पारस केमिकल नावाने कारखाना सुरु केला होता. या दोघांची परतापूर आणि टीपीनगर पोलिसांशी लागेबंधे आहेत.

या दोघांचा हा धंदा इतका पसरला होता की दररोज पाच-सहा टँकरभरुन पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जात होता. ज्या नामांकित पेट्रोल पंपांवर हे बनावट पेट्रोल पाठवले जात होते यामध्ये भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम आणि इंडिअन ऑईल सारख्या पंपांचा समावेश असल्याचे अमर उजालाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

रंग टाकताच तयार व्हायचे बनावट पेट्रोल-डिझेल

२० लिटर थिनरमध्ये केमिकल मिसळल्यानंतर या मिश्रणात ५० ग्रॅम रंग टाकल्यास पेट्रोल तयार होत होते. आरोपींनी छापेमारीवेळी पोलिसांना बनावट पेट्रोल बनवण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले. अशा प्रकारे एक टँकर इंधन बनवायला १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. यानंतर हे बनावट पेट्रोल-डिझेल विविध पंपांवर पाठवले जात होते.