भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरकाने एअर इंडियाच्या एका विमानात मोठा गोंधळ घातला. करुणाकांत द्विवेदी असं या प्रवाशाचं नावं आहे ज्याला मुंबईच्या सहार पोलिसांनी अटक केली आहे. एअर इंडियाच्या सिनियर क्रू मेंबर शिल्पा मिश्रा यांनी द्विवेदी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. द्विवेदी यांच्यावरील आरोप खूप गंभीर आहेत. शिल्पा यांनी सांगितलं की, एअर इंडियाच्या एआय १३० विमानाने १० मार्च रोजी लंडनवरून भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केलं. परंतु काही वेळाने विमानाच्या टॉयलेटमधून धूर येताना दिसला तसेच या धुरामुळे अलार्म वाजू लागला.

शिल्पा यांनी इतर क्रू मेंबर्सच्या मदतीने टॉयलेटचा दरवाजा उघडला. तेव्हा द्विवेदी आतमध्ये सिगारेट पित होता. त्याला असं करण्यापासून रोखण्यात आलं. तसेच याबाबत पायलटलादेखील माहिती देण्यात आली. सर्वांनी आरोपीला समजावलं, परंतु तो क्रू मेंबर्ससोबत विचित्र वर्तन करू लागला. त्यानंतर क्रू मेंबर्सने त्याच्या हातातील सिगारेट आणि लायटर हिसकावून त्याला त्याच्या सीटवर बसवलं.

त्यानंतर द्विवेदी पुन्हा सीटवरून उठला आणि त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानातील प्रवासी घाबरले. इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु द्विवेदीने त्या प्रवाशाला मारहाण केली. द्विवेदीने प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर क्रू मेंबर्सनी इतर प्रवाशांच्या मदतीने द्विवेदीला पकडलं आणि त्याचे हात बांधून पुन्हा सीटवर बसवलं. परंतु द्विवेदी थांबला नाही, त्याने पुन्हा आदळआपट सुरू केली.

हे ही वाचा >> “महाराष्ट्रातल्या कुत्र्यांना…” बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गोंधळ, अटकेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंजेक्शन देऊन केलं बेशुद्ध

करुणाकांत द्विवेदी अजूनच गोंधळ घालू लागला. त्यानंतर त्याच फ्लाईटमधील एक प्रवासी जे डॉक्टर होते त्यांनी द्विवेदीला Diaz tan Intra Insular नावाचे दोन इंजेक्शन दिले. त्यानंतर तो शांत झाला. ११ मार्चला विमान मुंबई विमानतळावर पोहोचलं. त्यानंतर क्रू मेंबर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी द्विवेदीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.