उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे असं प्रशासनाने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सांगितलं होतं. बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटे मजुरांना सुखरूप बाहेर काढलं जाईल असंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, अंतिम खोदकामादरम्यान अडथळे येत असल्याचं सांगण्यात आलं. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा येत असल्याने अमेरिकन ऑगर मशीन सुरळीत काम करू शकत नाही असं बुधवारी सांगण्यात आलं. खोदकाम करून ३२ इंच रुंदीची नलिका (पाइप) टाकून या मजुरांना नलिकेद्वारे बाहेर काढलं जाणार आहे. परंतु, पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून (२३ नोव्हेंबर) कोणतीही प्रगती झाली नसल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एनडीएमए) शुक्रवारी देण्यात आली.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी अजूनही १५ मीटर ढिगाऱ्यातून खोदकाम शिल्लक असल्याचे एनडीएमएने सांगितलं आहे. दुसऱ्या बाजूला, मजुरांची सुटका कधी होईल याबाबत माध्यमांनी कोणतेही अंदाज वर्तवू नयेत असं आवाहनही एमडीएमएने केलं आहे. बोगद्यात १३ दिवसांपासून ४१ मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी ढिगाऱ्यातून खोदकाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आतपर्यंत पाइप टाकले जात आहेत. मात्र, या कामात सातत्याने तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे अडथळे येत असल्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.

scam alert im ms dhoni stuck in ranchi need Rs 600 Scammer pretends to be MS Dhoni
रांचीमध्ये अडकलोय, ६०० रुपये पाठवशील का? धोनीकडून पैशांची मागणी? पुरावा म्हणून काय दाखवलं पाहा
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
vasai virar municipal corporation marathi news, vasai virar property tax marathi news
वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली

ज्या परदेशी मशीन्सच्या सहाय्याने आतापर्यंतचं खोदकाम केलं आणि बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मजुरांना बाहेर काढलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता, ती मशीनच आता या बचाव मोहिमेसमोरचा मोठा अडसर बनू लागली आहे. ज्या मशीनची सर्वाधिक चर्चा होत आहे ती मशीन आता सातत्याने बिघडत आहे. खोदकामाचं बहुतांश काम या मशीनच्या सहाय्याने झालं असलं तरी आता ही मशीन सतत बिघडत आहे. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा येत आहे. या सळ्यांमुळे मशीन बिघडतेय. परिणामी खोदकाम थांबवावं लागत आहे. तसेच मशीन दुरुस्त करण्यास वेळ लागतोय. मशीन दुरुस्त करण्यासाठी गुरुवारी दिल्लीहून इंजिनियर उत्तरकाशीला पाठवण्यात आले होते.

हे ही वाचा >> उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले कामगार खेळतात चोर-पोलीस; मनोविकारतज्ज्ञ म्हणतात…

या बचाव मोहिमेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पूर्णपणे अमेरिकन ऑगर मशीनवर अवलंबून नाही. त्यांचा प्लॅन बी तयार आहे. परंतु, ही योजना थोडी अवघड आहे. एमडीएमए मॅन्युल ड्रिलिंगचा (कामगारांनी केलं जाणारं खोदकाम) विचार करत आहे. आतापर्यंत ऑगरसारख्या मोठ्या मशीनच्या सहाय्याने खोदकाम करायला इतके दिवस लागले, तर आता कामगार छोट्या मशीन्स आणि अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करू लागले तर त्यास किती वेळ लागेल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.