Uzbekistan Cough Syrup Death Updates : काही दिवसांपूर्वी गांबिया देशात कफ सिरपच्या सेवनामुळे ६६ मुलांचा मृत्यू झाला होता. भारतातील औषधनिर्मिती कंपन्यांनी हे कफ सिरप तयार केले होते. या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने मुलांना कफ सिरप देताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. असे असतानाच आता उझबेकिस्तानमध्येमूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपचे सेवन केल्यामुळे १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानने केला आहे.

हेही वाचा >> परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना चीनकडून पारपत्र

उझबेकिस्तानने आरोप केलेली कंपनी ही मूळची भारतीय असून तिचे नाव मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली या कंपनीची नोंद करण्यात आली होती. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली असून याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मुलांचा मृत्यू का झाला असावा, याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

हेही वाचा >> गुलाम नबी आझाद यांना धक्के, आतापर्यंत १२६ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी; प्रस्थापित होण्याआधीच अस्तित्व धोक्यात?

मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या डॉक-१ मॅक्स सायरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये आतापर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप (Dok-1 Max Syrup) देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >> लहान मुलांसाठीच्या ‘या’ चार कफ सिरपचे गंभीर दुष्परिणाम? WHO नं दिला इशारा, भारतात चौकशी सुरू!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या सायरपमध्ये पॅरासिटॉमॉल हा मुख्य घटक आहे. डॉक-१ मॅक्स सायरपचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. सर्दीवरील उपाय म्हणून डॉक्टरांनी सुचवलेले नसतानाही फक्त औषध विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार हे औषध देण्यात आले. याच कारणामुळे मुलांची प्रकृती खालावली,’ असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.