करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने स्थगित ठेवण्यात आलेली जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्य़ातील त्रिकुट टेकडय़ांमधील वैष्णोदेवी या गुहेतील तीर्थक्षेत्राची यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. ही यात्रा गेल्या १८ मार्चला स्थगित करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही यात्रा सोमवारपासून सुरू होईल आणि पहिल्या आठवडय़ात यात्रेकरूंची संख्या दररोज २ हजारांपर्यंत मर्यादित केली जाईल. यापैकी १९०० यात्रेकरू जम्मू- काश्मीरमधील आणि उर्वरित १०० बाहेरच्या राज्यांतील असतील. यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले.

यात्रा नोंदणी खिडकीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी, केवळ ऑनलाइन माध्यमातून नोंदणी केल्यानंतर लोकांना यात्रा करण्याची परवानगी दिली जाईल. या यात्रेकरूंना त्यांच्या मोबाइलवर आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. मुखपट्टी व चेहऱ्यावरील आच्छादन घालणे अनिवार्य राहणार असून, यात्रेच्या प्रवेशस्थळी लोकांचे तापमान मोजले जाईल, असेही कुमार म्हणाले.

१० वर्षांखालील मुले, गर्भवती स्त्रिया, अनेक आजार असलेले लोक आणि ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक यांना यात्रा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या गटासाठी नव्याने सूचना जारी केल्या जातील, अशीही माहिती कुमार यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaishnodevi yatra resumes from tomorrow abn
First published on: 16-08-2020 at 00:53 IST