Vande Bharat Express Train Accident : काल ( गुरूवार ६ ऑक्टोबर ) ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ म्हशींची धडक झाल्याने अपघात झाला होता. आज पुन्हा गाईला धडकल्याने मुंबई गांधीनगर मार्गावर या गाडीचा अपघात झाला आहे. त्यामुळे १० मिनिटे ही गाडी थांबवण्यात आली होती.

हेही वाचा – वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

आज झालेल्या अपघात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे जास्त नुकसान झाले नसून समोरचा भाग चपकला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे माहिती अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, काल झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “रेल्वेपुढे असे जनावरे येणं टाळता येणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची रचना करण्यात आली होती.”

कालही झाला होता अपघात

गुरुवारी गुजरातमधील मनीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला होता. या अपघातात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झालं होते. संबंधित रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत असताना काही म्हशी आडवी आल्याने हा अपघात झाला होता, शी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली होती.