वंदे भारत एक्स्प्रेसचं 'नाक' तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात | Vande bharat express train accident at maninagar rmm 97 | Loksatta

वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात
फोटो- ट्विटर/ Rajendra B. Aklekar

Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे. या अपघातात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं आहे. संबंधित रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत असताना काही जनावरे लोहमार्गात आडवी आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं असलं तरी रेल्वे सेवेवर कोणाताही परिणाम झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अपघात घडला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी सेमी हायस्पीड रेल्वे आहे. ही रेल्वे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांसाठी सुकर ठरत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Thailand Mass Shooting : पाळणाघरात बेछुट गोळीबार, चिमुरड्यांसह ३१ जणांचा खून, नंतर आत्महत्या, थायलंडमधील थरारक घटनेत काय घडलं? वाचा…

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी भीमशक्ती माझ्याबरोबर असल्याने…”
“आमच्या वेदनांचा तुम्हाला फायदा होत असेल तर…”; रशियाकडील स्वस्त तेल खरेदीवरुन युक्रेनचा भारताला टोला
शिवसेनेतील बंडखोरीच्या सर्व याचिकांवर सुनावणी होणार, तारीख सांगत सरन्यायाधीश म्हणाले, “घटनापीठात…”
Gujarat Election Exit Poll: गुजरातमध्ये ‘सातवी बार भाजपा सरकार’चा अंदाज! केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एका नव्या..”
विवेक अग्निहोत्रीने मागितली विनाअट माफी, मात्र, दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, “एवढं पुरेसं नाही, तर…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक; तरुणीसह तिघांना अटक
मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज
“त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस…”, महिला मुख्यमंत्रीबाबत उद्धव ठाकरेंच्या विधानावर चित्रा वाघ यांचा टोला
पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
‘आमचाही सरकारी नोकरीमध्ये समावेश करा, अन्यथा मंत्रालयाबाहेर आत्मदहन करेन’; तृतीयपंथीचा राज्य सरकारला इशारा