Andy Byron And HR Kristin Cabot Video : बोस्टनमधील हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही चर्चा एका ‘किस कॅम’ व्हिडीओची आहे. या कॉन्सर्टमधील व्हायरल होणारा व्हिडीओ सॉफ्टवेअर कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न आणि एचआर कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचा आहे. दरम्यान, या कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्याच कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर उघडकीस आलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांना मिठी मारून रोमान्स करताना दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सीईओ अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सीईओ अँडी बायरन यांना रजेवर पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. या टेक कंपनीने शुक्रवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये नेतृत्व बदलाची पुष्टी केली. ‘अँडी बायरन यांना रजेवर पाठवण्यात आल्यामुळे सहसंस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम करत आहेत. त्यानंतर एक फॉलो-अप विधान देखील आलं देण्यात आलं आहे. आम्ही येत्या काही दिवसांत योग्यतेनुसार अधिक तपशील शेअर करू’, अशी माहिती एक्समधील पोस्टमधून देण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओमुले अफेअर झालं उघड

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिनने कॉन्सर्टदरम्यान किस कॅमचा वापर केला आहे. याच किस कॅमच्या मदतीने कॅमेऱ्यानं एका जोडप्याला स्पॉट केलं आणि एका मोठ्या पडद्यावर त्यांचा रोमँटिक परफॉर्मन्स दाखवण्यात आला. यावेळी दोघेही अगदी कोझी वातावरणात परफॉर्मन्सचा आनंद घेत होते. पण, स्पॉटलाइट आणि किस कॅमचा फोकस त्यांच्यावर रोखला गेला, हे जेव्हा दोघांनी पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

दोघेही लगेच चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागले. नेमकं घडलं तरी काय ते कोणाला काहीच समजत नव्हते. पण, हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण- कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये रोमँटिक परफॉर्म करणारी दोघं साधीसुधी माणसं नव्हती, तर अ‍ॅस्ट्रोनॉमर या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि कंपनीची एचआर हेड क्रिस्टीन कॅबॉट हे दोघे होते. व्हिडीओत पुढे कॅमेरा फोकसमध्ये येताच एचआर हेड क्रिस्टीन कॅबॉट मिठीतून दूर होत मागे वळून लाजेनं लगेच तिचा चेहरा लपवते. तर, सीईओ अँडी बायरन कॅमेऱ्यापासून दूर होत खाली बसताना दिसत आहेत.

या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतेय. अनेक सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सीईओ अँडी बायरन हे विवाहित आहेत. मेगन केरिगन बायरन असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. त्यांना दोन मुलं आहेत; पण या व्हिडीओमुळे त्यांचे एचआर हेडबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप होत आहेत.