एअर इंडिया घेतल्यानंतर टाटा समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये आता तीन एअरलाइन्स आहेत. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा संयुक्त उपक्रमाद्वारे विस्तारा ऑपरेशन्सवर देखरेख करते. तसेच, टाटा समूह, एअर एशियासह संयुक्त उपक्रमात एअर एशिया इंडियाद्वारे विमानसेवा देखील प्रदान करत आहे. एअर इंडियाची सूत्र टाटाकडे येताच विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण होईल अशी चर्चा रंगली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने पुढे जायचं की नाही यासाठी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वेळ मागितल्याचं बोललं जात आहे. टाटा सन्सने सिंगापूर एअरलाइन्ससोबत विस्तारामधील संभाव्य विलीनीकरण करण्यासाठी चर्चा केल्याचं सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

“टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सने या वर्षाच्या सुरुवातीला विलीनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा केली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियासाठी टाटा बोलीमध्ये सामील होण्यासही सहमती दर्शविली होती. परंतु साथीच्या आजारामुळे, तिची खराब आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला,” या बाबत माहिती असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली. टाटा समूहाला बोली लावण्याची परवानगी देण्यासाठी सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराच्या करारातील गैर-स्पर्धी कलम काढून टाकले होते. एअर इंडिया आता पूर्णपणे टाटा समूहाच्या मालकीची आहे, तर विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्समधील ५१:४९ चा संयुक्त उपक्रम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विस्तारा एअरलाइन्स ही टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या दोन कंपन्यांनी मिळून ९ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीचे कामकाज सुरू केले. टाटा Neu अ‍ॅप यावर्षी ७ एप्रिल रोजी लाँच करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर ग्राहकाला प्रत्येक खरेदीसाठी नवीन लॉयल्टी पॉइंट मिळतो. या अ‍ॅपवर ग्राहकाला प्रत्येक खरेदीसाठी नवीन लॉयल्टी पॉइंट मिळतो. त्याचप्रमाणे विस्ताराचा क्लब विस्तारा नावाचा फ्रिक्वेंटफ्लायर प्रोग्राम आहे आणि तो प्रत्येक खरेदीसाठी प्रवाशांना CV पॉइंट्स देतो. टाटा समूहाची एअरएशिया एअरलाइन या अ‍ॅपवर आधीच नोंदणीकृत आहे. टाटा समूहाच्या विस्तारा, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस अद्याप टाटा नियू अ‍ॅपमध्ये सामील झालेल्या नाहीत.