मॉस्को : व्लादिमीर पुतिन यांनी आगामी वर्षांत मार्चमध्ये होत असलेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आपली उमेदवारी जाहीर केली. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुतिन यांनी शुक्रवारी क्रेमलिन पुरस्कार सोहळय़ानंतर १७ मार्च रोजी होत असलेल्या रशियन अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीच्या नायब राज्यपालांना नोटीस

युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या अनेक ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पुतिन यांना ही निवडणूक लढवण्याची विनंती केली. या अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे होकार दिल्याचे ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यक्रेन युद्धावर रशियाचा प्रचंड खर्च होत आहे. पुतिन यांच्या जवळपास २५ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही रशियात त्यांना अद्यापही व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कारकीर्दीत रशियात अंतर्गत हल्ले झाले. रशियन सत्ताकेंद्र ‘क्रेमलिन’वरही हल्ला झाला. पुतिन यांचाच एके काळी निकटवर्तीय मानल्या गेलेल्या येवगेनी प्रिगोझिन याच्या भाडोत्री लष्कराने जूनमध्ये अल्पकालीन बंडखोरीनंतर पुतिन यांची रशियावरील पकड कायम आहे.