scorecardresearch

Premium

तेलंगणमध्ये आज मतदान

आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील ११९ जागंसाठी गुरुवारी मतदान होत आहे.

Voting today in Telangana
तेलंगणमध्ये आज मतदान ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, हैदराबाद

आरोप-प्रत्यारोप तसेच देशभरातील प्रमुख नेत्यांच्या सहभागानंतर तेलंगण विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राज्यातील ११९ जागंसाठी गुरुवारी मतदान होत आहे. प्रमुख लढत सत्तारुढ भारत राष्ट्र समिती (बीआरएस) तसेच काँग्रेस व भाजप अशी अपेक्षित आहे. एकूण ३५ हजार ६५५ मतदान केंद्र आहेत. तर तीन कोटी २६ लाख मतदान असून, रविवारी दि. ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. तेलंगणबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम येथील मतमोजणी याच दिवशी होत आहे.

bsp leader in bjp
मायावतींच्या बसपाला मोठा धक्का; “पक्षात मला संधी नाही” म्हणत खासदाराचा भाजपामध्ये प्रवेश
raj thakre
लोकसभा निवडणुसाठी सज्ज आहात का? राज ठाकरे यांचा भिवंडी, कल्याणमधील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
Aditi Tatkare
रायगडमध्ये निधीच्या विनियोगात मंत्री आदिती तटकरे पिछाडीवर
Uddhav Thackeray visit to Shirdi
उद्धव ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गटबाजीचे दर्शन

राज्यातील १०६ मतदार संघांत सकाळी सात ते पाच अशी मतदानाची वेळ असून, नक्षलवादग्रस्त १३ ठिकाणी सकाळी ७ ते ४ अशी वेळ आहे. एकूण २२९० उमेदवार िरगणात आहेत. बीआरएस सर्व ११९ जागा लढवत आहे. भाजपने १११ तर मित्र पक्ष असलेल्या अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला ८ जागा सोडल्या आहेत. काँग्रेस ११८ जागांवर लढत असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाला त्यांनी एक जागा सोडली आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने नऊ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राज्यात २०१४ पासून बीआरएसची सत्ता आहे. यंदा काँग्रेसने मोठे आव्हान उभे केलय. भाजपने यंदा दक्षिणेतील या राज्यात प्रचाराचा जोर लावला होता.

हेही वाचा >>>पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…

मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे गजवल तसेच कामारेड्डी या दोन मतदारसंघातून भाग्य आजमावत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी राव यांना कामारेड्डी मतदारसंघात आव्हान दिले आहे. याखेरीज लोकसभा सदस्य असलेले रेड्डी हे कोंडागल या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून िरगणात आहेत. भाजप नेते इटाला राजेंद्र हे गजवलमध्ये केसीआर यांच्याविरोधात रिंगणात आहेत. याखेरीज हुजुराबाद या त्यांच्या मतदारसंघातून पुन्हा कौल मागत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभर सभा घेतल्या. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यात प्रचार केला. सत्तारुढ बीआरएसच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने पक्षाचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्यावरच होती. त्यांनी ९६ सभा घेतल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Voting today in telangana amy

First published on: 30-11-2023 at 01:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×