पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढेच एक रुग्णवाहिका जात आहे. तर, काही लोक रोडवरून जाताना दिसत आहे. अशातच बस रोडच्या खाली उतरुन अचानक उलटती. बस उलटल्यानंतर बसच्या वरती बसलेले प्रवाशी खाली दबले जातात. हा अपघात झाल्यावर परिसरातील लोक तत्काळ मदतीसाठी येतात. तसेच, बसखालील दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

हेही वाचा : जोशीमठ गर्तेत..; भूस्खलन क्षेत्र घोषित, संकटाला तोंड देण्यासाठी उपायांचा शोध सुरू

कटवा-बीरभूम महामार्गावर झाला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कटवा-बीरभूम राज्य महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा प्रकृती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कटवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, काहींवर उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मृताची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : विमानातील घृणास्पद कृत्याची तत्परतेने दखल घेण्यात अपयश; टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याकडून खेद व्यक्त

बस चालकाला केली अटक

पूर्व बर्धमान जिल्ह्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास यांनी सांगितलं की, “या अपघातात ४५ जण जखमी झाले आहेत. चालकाला अटक करण्यात आली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत,” अशी माहिती दास यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal east burdwan bus overturns one killed and 45 injured cctv footage viral ssa
First published on: 09-01-2023 at 09:47 IST