देशात करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घेऊन विविध निर्बंध लादले गेले आहेत. देशातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. पण आता भारतात करोनाची रुग्णांची संख्या झाल्यामुळे अनलॉक करण्यास  राज्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत  राज्यांनी आता शाळादेखील सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. यावर केंद्राने आता शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक संस्था बंद असल्याने देशभरात अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे, बहुतेक शिक्षकांना लसीकरण झाल्यावरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली. “शाळा सुरु करण्यासारखी परिस्थिती लवकर यायला पाहिजे. परदेशांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आणि त्या बंद कराव्या लागल्या. याचा विचार देखील आपल करायला हवा. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशा परिस्थितीसमोर उभे करायचे नाही,” असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत नीति आयोगाचे(आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश! शिक्षण विभागाचा निर्णय

पॉल यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सच्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचा दाखला देत १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही कोविड -१९ विरूद्ध प्रतिपिंड विकसित झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर देशातील तिसऱ्या लाटेचा परिणाम होणार नाही असे सांगितले. “परंतु याचा अर्थ असा नाही की शाळा सुरू होऊ शकतात आणि मुलांनी सामाजिक अंतर राखण्याची आवश्यकता नाही. मुलांच्या सिरोपॉझिव्हिटी रेटसंबंधित हा शोधाचा प्रश्न आहे की. शाळा पुन्हा कधी उघडल्या पाहिजेत?” असे डॉ. पॉल म्हणाले.

तालुकानिहाय संक्रमण दर ठरवून शाळा सुरू करा

“बर्‍याच गोष्टी आपल्याला अजूनही माहित नाहीत. शाळा पुन्हा सुरू करणे हा एक वेगळा विषय आहे कारण तो केवळ विद्यार्थ्यांविषयीच नाही तर त्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रतिकारशक्ती ही केवळ एक कल्पना आहे. आज विषाणूचे स्वरुप बदलले की नाही याचा विचार करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत. आज मुलांमध्ये करोना  सौम्य स्वरुपात आढळत आहे, परंतु उद्या जर तो तीव्र झाला तर काय होईल, ”असे डॉ पॉल म्हणाले.