मेजर सुरेंद्र पुनिया यांनी एक व्हायरल व्हिडिओ पोस्ट करत त्यावर आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती तिरंगा झेंडा हातात कापडासरखा घेऊन टेबल आणि खुर्च्या पुसताना दिसतो आहे. हा व्यक्ती कोण आहे? हे समजू शकलेलं नाही. मात्र तिरंग्याचा अपमान करणारे हे बेशरम लोक कोण आहेत असा प्रश्न मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केला आहे.

तिरंग्याचा अपमान होतानाचा व्हिडिओ व्हायरल

तिरंगा हा आपल्या देशाचा ध्वज आहे. त्याचा अपमान होऊ नये म्हणून अनेकदा सरकारकडूनच आवाहन केलं जातं. अशात या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिरंगा घेऊन चक्क टेबल खुर्च्या पुसताना दिसत आहे. फडक्याने जाळी किंवा धूळ झटकावी त्या प्रमाणे तिरंग्याचा वापर करत आहेत. या व्हिडिओत आणखी एक माणूस येतो. तो माणूसही या व्यक्तीला ही कृती करण्यापासून रोखत नाही. त्यामुळे मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत हे बेशरम लोक नेमके कोण आहेत? तिरंग्यासोबत ते काय करत आहेत असे प्रश्न विचारत आपला संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओ नवी मुंबईतला?

हा व्हिडिओ नवी मुंबईतला असू शकतो कारण या ट्विटर मेजर पुनिया यांना नवी मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. नवी मुंबई पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा असं नवी मुंबई पोलिसांनी मेजर पुनिया यांना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओबाबत संताप व्यक्त केला आहे. जिहादी मानसिकतेचे लोक असंच वागणार असा रिप्लाय काही नेटकऱ्यांनी दिला आहे. तर राष्ट्रध्वजाचा अपमान करणं हा दंडनी अपराध आहे पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने या व्यक्तीविरोधात कारवाई केली पाहिजे असं एका युजरने म्हटलं आहे. हे लोक भ्रष्ट सरकारी अधिकारी वाटत आहेत असंही काही जणांनी म्हटलं आहे.