माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अतिकचे मारेकरी कोण होते, ते तिथे कसे आले? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तसेच उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारवरही टीका होऊ लागली आहे.

अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार झाला तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना काही प्रश्न विचारत होते. दोन्ही भावांनी बोलायला सुरुवात केली तेवढ्यात त्यांच्यावर गोळीबार झाला. काही माध्यमांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, हल्लेखोर माध्यमांचे प्रतिनिधी बनून तिथे आले होते. हल्लेखोरांनी गळ्यात माध्यमांचं ओळखपत्रदेखील अडकवलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

प्रयागराज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पिस्तूलं, एक मोटरसायकल, एक व्हिडीओ कॅमेरा जप्त केला आहे. तसेच त्यांना तिथे एका वृत्तवाहिनीचा लोगो सापडला आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला आहे की, हल्लेखोांनी अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार केल्यानंतर तिथे ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या होत्या.

हे ही वाचा >> “ज्या समाजात मारेकऱ्यांना हिरो मानलं जातं…” अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर औवेसींची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय होते अतिकचे अखेरचे शब्द?

अतिक त्याच्या मुलाच्या अंत्ययात्रेला जाऊ शकला नव्हता, त्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला विचारलं की, तुम्ही काही म्हणू इच्छिता का? तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं गेलं नाही. त्यावर अतिक म्हणाला “हो आम्हाला नाही नेलं गेलं… पण मुख्य गोष्ट ही आहे की..” अतीक अहमद पुढे काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. १३ एप्रिल रोजी अतिक अहमदच्या मुलाचं एन्काऊंटर कऱण्यात आलं. त्यापाठोपाठ आता अतीक आणि अशरफ या दोघांची हत्या करण्यात आली.