scorecardresearch

Premium

‘भूसंपादन विधेयकाविरुद्ध महाभारतसदृश युद्ध’

भाजपला दूर करण्यासाठी जनता परिवारातील सहा पक्ष एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत देशवासीयांना देण्यात आले असल्याचे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

‘भूसंपादन विधेयकाविरुद्ध महाभारतसदृश युद्ध’

भाजपला दूर करण्यासाठी जनता परिवारातील सहा पक्ष एकत्र येत असल्याचे स्पष्ट  संकेत देशवासीयांना देण्यात आले असल्याचे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. भूसंपादन विधेयकाविरुद्ध महाभारतसदृश युद्ध पुकारण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाशा गुंडाळावा यासाठी जनता परिवाराचे विलीनीकरण होत आहे. सर्व देशाचे लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे लागले आहे, असेही लालूप्रसाद म्हणाले. भूसंपादन विधेयकावर आम्ही भाजपशी महाभारतसदृश युद्ध करू, असेही त्यांनी वार्ताहरांना सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will launch mahabharata like war over land bill lalu prasad yadav

First published on: 02-04-2015 at 03:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×