पतीने पत्नीला दारु पाजून मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुअनंतपूरम येथे ४ जून रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी सातव्या आरोपीचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. महिलेने पती आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार करताना दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला जबरदस्ती दारु पाजत पाच वर्षांच्या मुलासमोर सामूहिक अत्याचार करण्यात आला. “आम्ही अद्याप सातव्या आरोपीला अटक करु शकलेलो नाही. मुलाने आम्हाला सर्व घटनाक्रम सांगितला. त्याला झालेल्या मारहाणीबद्दलही आम्हाला सांगितलं,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलासमोर घटना घडल्याने पॉक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळ राज्य महिला आयोगानेही घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “पतीने मला आणि दोन्ही मुलांनी पाँडिचेरी येथील एका बीचवर नेलं होतं. नंतर मित्राच्या घरी नेलं. तिथे जबरदस्ती दारु पाजत मोठ्या मुलासमोरच लैंगिक अत्याचार करण्यात आले”. महिलेने तेथून पळ काढत एका व्यक्तीची मदत घेतली. त्या व्यक्तीने महिलेला आपल्या घरी नेलं आणि पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. महिलेने पोलीस तक्रारीत आरोपींनी सिगारेटचे चटके दिल्याचंही म्हटलं आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman forced to drink liquor and gangraped in thiruvananthapuram sgy
First published on: 06-06-2020 at 17:14 IST