पतीची हत्या करून तीन दिवस एक महिला त्याच्या मृतदेहासोबत राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेनं पतीची हत्या केल्याचं कबूल केलं असून सध्या तिची चौकशी चालू आहे. ही महिला मुलांसमवेत तीन दिवस मृतदेहासोबत राहात होती, असंही या महिलेनं आपल्या कबुलीजबाबात नमूद केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. ओडिशामधील हा प्रकार असून त्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

ओडीशाच्या केओनझार जिल्ह्याच्या कोडिपसा गावातली ही घटना आहे. या महिलेनं गेल्या रविवारी तिच्या पतीची राहत्या घरात एका लोखंडी रॉडनं डोक्यावर वार करून हत्या केली. मात्र, तीन दिवस ती पतीच्या मृतदेहासोबतच राहात होती. यावेळी तिची चार मुलंही त्याच घरात राहात होती. बुधवारी काही स्थानिकांना संशय आल्यानंतर त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात कळवल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेला अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

वाशीम : भर वस्तीत मंदिरासमोर निर्घृण हत्या, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लोखंडी रॉडने केला डोक्यात वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पतीला दारूचं व्यसन होतं. त्यामुळे दोघांमध्ये कायम वाद होत असत. या महिलेला पतीकडून दारूच्या नशेत मारहाण केली जात होती. रविवारी त्यांच्यात या मुद्द्यावरून पुन्हा भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की या महिलेचा राग अनावर झाला व तिने एका लोखंडी रॉडने पतीच्या डोक्यावर वार केला. यात पतीच्या डोक्याला जबर जखम झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेनंही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून यासंदर्भात पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.