एकीकडे जगभरातील प्रेमी जोडपी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची तयारी करत असताना आयर्लंडमधील एक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणीवर तिच्याच प्रियकराकडून बलात्कार आणि लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. प्रकरण न्यायालयात गेलं असता न्यायालयाने पीडितेला ७.८ कोटींची भरपाई दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला दहा वर्ष रिलेशनमध्ये होते. यावेळी अनेकदा प्रियकराने झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला. महिलेने सांगितलं आहे की, तिच्या प्रियकराने २९ एप्रिल २०१२ रोजी ई-मेलच्या माध्यमातून आपण अनेकदा बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. यानंतर महिला तणावात गेली होती. महिलेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर महिलेने २०१३ मध्ये झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणाने आपल्याला पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं असं महिलेचं म्हणणं आहे. महिलेने अनेकदा घर सोडून जाण्याचाही प्रयत्न केला होता. महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर आरोपीला १५ महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

पण महिला या प्रकरणानंतर इतकी घाबरली होती की, आपल्या आई-वडिलांवर विश्वास ठेवतानाही तिला भीती वाटू लागली होती. महिलेने भीतीमुळे नोकरीही सोडली होती. हे प्रकरण सिव्हील कोर्टात गेलं होतं. ७ फेब्रुवारीला न्यायालयाने महिलेला ७.८ कोटींची भरपाई दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman raped by boyfriend while she slept is awarded compensation sgy
First published on: 10-02-2020 at 13:07 IST