टेस्ट ट्युब तंत्रज्ञानाद्वारे दक्षिण आफ्रिकेमध्ये सिंहाच्या दोन छाव्यांचा जन्म झाला आहे. कृत्रिम गर्भाधानद्वारे जन्माला आलेली जगातील ही पहिली जोडी आहे. यामध्ये एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. दक्षिण अफ्रीकेतील प्रिटोरियामधील संरक्षण केंद्रातील फोटोमध्ये दोन छावे दिसत आहेत. हे दोन्ही छावे थोडे वेगळे दिसत आहे.  प्रिटोरिया विद्यापीठातील संशोधक आफ्रिकेतील सिंहाच्या प्रजनन तंत्राबाबत संशोधन करत होते. आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा पद्धतीचा वापर करून या छाव्यांचा जन्म झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिटोरिया मॅमल रिसर्च इंस्टिट्यूटचे डायरेक्टर आंद्रे गांसविंड याबद्दल म्हणाले की, ‘२५ ऑगस्ट रोजी या दोन्ही छाव्याचा जन्म झाला आहे. यामध्ये एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. या दोघांचे स्वास्थ उत्तम आहे. १८ महिन्यांचे परिक्षण आणि मेहनीतीनंतर संशोधकांना यश आले आहे. या दोन्ही छाव्यांसाठी एका सिंहाचे स्पर्म घेतले होते. त्यानंतर जेव्हा सिंहिणीचा हार्मोनचा स्तर सामान्य अवस्थेत आल्यानंतर सिंहाच्या स्पर्मला कृत्रिम पद्धतीने ट्रांसपोर्ट केले. आम्ही या प्रयोगामध्ये यशस्वी झालेचा आनंद आहे.’

‘कृत्रिम छाव्याच्या निर्मितीसाठी आम्ही अनेक प्रयोग केले, पण आम्हाला अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळाले. अशा प्रकारे यापुढे अनेक छाव्यांना जन्माला घातले जाऊ शकते. सिंहाप्रमाणे इतर प्राण्यांची निर्मितीही कृत्रीम पद्धतीने करता येऊ शकते. ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवले जाऊ शकते’ असे आंद्रे गांसविंड म्हणाले.

आफ्रिकेच्या २६ देशांतील सिंहाच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या संख्येत ४३ टक्केंनी कपात झाली आहे. आता फक्त २० हजार सिंह जिंवत राहिले आहेत. जर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्यात आपण सिंहला पाहू शकणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World first lion cubs born by test tube technique in south africa
First published on: 30-09-2018 at 20:45 IST