जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, ते ओमायक्रॉनच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारातील दोन नवीन उपप्रकारांचे परीक्षण करत आहे. हे उपप्रकार BA.4 आणि BA.5 म्हणून ओळखले जातात. BA.1.1 आणि BA.3 ची नावे देखील त्याच्या उपप्रकारांच्या यादीत जोडली गेली आहेत. जागतिक स्तरावर, आजकाल BA.1 आणि BA.2 ची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.

WHO सध्या BA.4 आणि BA.5 या नवीन स्ट्रेनचे निरीक्षण करत आहे. त्याला हे उपप्रकार अधिक सांसर्गिक आणि धोकादायक आहेत का? ते पहायचे आहे.

WHO च्या मते, जागतिक GISAID डेटाबेसमधून BA.4 आणि BA.5 ची फक्त काही डझन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओने सांगितले की “अतिरिक्त म्युटिशयन्सचा रोगप्रतिकारक क्षमतेवर होणार प्रभाव समजून घेण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीने (UKHSA) गेल्या आठवड्यात सांगितले की 10 जानेवारी ते 30 मार्च दरम्यान, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, बोत्सवाना, स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये BA.4 ची प्रकरणे नोंदवली गेली.