गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्र्र उडून गेली आहे ती परत आलेली नाही. त्याला हवामानातील बदल, मोबाइल टॉवरची प्रारणे अशी एक ना अनेक कारणे सांगितली जातात, पण या चिमण्या परत याव्यात यासाठी तुम्ही जागतिक समुदायाच्या प्रयत्नांचा भाग बनू शकता. येत्या २० मार्चला ‘चिमणीदिन’ आहे. त्यानिमित्त तुम्ही http://www.worldsparow.org  या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता.
ही मोहीम नंतर गुगल मॅपवर आणली जाणार असून चिमणीप्रेमी व्यक्तींना एकत्र जोडले जाणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या ठिकाणी चिमण्यांच्या हितासाठी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता.
मुंबईच्या नेचर फॉरएव्हर सोसायटीचे महंमद दिलावर यांनी सांगितले, की २०१०पासून जागतिक चिमणीदिन साजरा केला जातो. एकूण ५० देशांत हा दिन साजरा केला जातो. शहरी भागात चिमण्यांची संख्या कमी झाल्याने नेचर फॉरएव्हर सोसायटी या संस्थेने बरेच काम केले आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.
जगभरातील चिमणीप्रेमींना विविध भागांत एकत्र जमवून चिमण्यांना परत आणण्यासाठी व जैवविविधता टिकवण्यासाठी काम करता येईल असे दिलावर यांचे म्हणणे आहे. पक्षिनिरीक्षण, स्पॅरो पार्टीज, स्पॅरो पिकनिक, स्पॅरो प्रोसेशन, बर्ड वॉक्स, स्पॅरो वॉक्स हे कार्यक्रम सोशल मीडियावर घेतले जातील. काही शैक्षणिक कार्यक्रमही केले जातील. आयोजनकर्त्यांनी त्यांचा कार्यक्रम संकेतस्थळावर टाकल्यानंतर तो गुगल मॅप व सोशल मीडियावर दिसू लागेल. कार्यक्रमाच्या यजमानांना प्रशस्तिपत्रही दिले जाणार आहे.
चिमण्या नष्ट झाल्या असून ज्या थोडय़ा उरल्या आहेत त्यांना वाचवण्याची गरज आहे. आपण आरोग्यदायी पर्यावरणासाठी, हरित पर्यावरणासाठी त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे असे दिलावर यांनी सांगितले.
येत्या २० मार्चला ‘चिमणीदिन’ आहे. त्यानिमित्त तुम्ही ६६६.६१’२िस्र्ं१६.१ॠ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता. ही मोहीम नंतर गुगल मॅपवर आणली जाणार असून चिमणीप्रेमी व्यक्तींना एकत्र जोडले जाणार आहे.