इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना मंगळवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत दिल्लीतील न्यायालयात आणण्यात आले.
यासिनच्या एनआयए कोठडीत २१ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यासिन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांना बिहारमधील नेपाळच्या सीमेवरून २९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. देशात २००६ पासून पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली आणि सूरतमध्ये झालेले वेगवेगळे बॉम्बस्फोट यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांनीच घडवून आणले होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत आणखी वाढ
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकळच्या एनआयए कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिल्लीतील न्यायालयाने दिला.

First published on: 17-09-2013 at 05:02 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasin bhatkals nia custody extended by four days