पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंज व्हिडिओवर एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या व्हिडिओसंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पीएमओने हे स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून महिन्यात क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेस चॅलेंज सुरु केले होते. त्यांनी विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिले होते. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. मोदींनीही विराट कोहलीने दिलेले चॅलेंज पूर्ण करत स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओवर ३५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप झाला. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी देखील यासंदर्भात ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली होती.

मोदींच्या व्हिडिओ संदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. यात पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिले आहे. ‘मोदींचा फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी चित्रित करण्यात आला असून व्हिडिओ शूट करणारा कॅमेरामनही पीएमओ कार्यालयातील कर्मचारी होता’, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या व्हिडिओवर एक रुपया देखील खर्च झालेला नाही, असे पीएमओने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero expenditure on making of narendra modis fitness challenge video pmo in rti reply
First published on: 22-08-2018 at 07:45 IST