Dhantrayodashi 2024:  धनत्रयोदशी या दिवाळीच्या पहिल्या दिवसाला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त भारतातच नाही, तर जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येते. यंदा ३१ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. त्यातही धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. म्हणजे या वर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.

या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो. त्याशिवाय दिवाळीत झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. पण, धनत्रयोदशीलाच झाडू खरेदी करण्यामागे नेमकी काय परंपरा आहे याविषयी जाणून घेऊ…

धनत्रयोदशीला दागिने आणि भांड्यांबरोबरच झाडूलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

का केली जाते झाडूची पूजा? (Dhantrayodashi  2024 Significance Of Purchasing Broom On Dhanteras)

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. झाडूला संपत्ती, समृद्धी व लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, झाडू हे घरातील दारिद्र्य, वाईट व नकारात्मकता गोष्टी काढून टाकण्याचे प्रतीक आहे. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. त्याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक असा समज आहे की, असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते.

हेही वाचा – दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश

एवढेच नाही, तर नवीन घरात प्रवेश करताना झाडू घेऊनच प्रवेश करणे शुभ मानले जाते. त्यात घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात झाडूचा नियमित वापर केला जातो. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते, असे म्हटले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस हा शब्द तेरावा दिवस दर्शवितो. पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली .

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे.)