भारताच्याच नाही तर जगातील सर्व उद्योजक, अनेकांसाठी प्रेरणा ठरणारे आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचा पाया रचणाऱ्या धीरुभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी आहे. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली, जी आता भारताची सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी आहे. धीरुभाई अंबानी म्हणजेच धीरजलाल हिराचंद अंबानी यांचा डिसेंबर १९३२ मध्ये झाला. त्यांचे कुटुंब अॅडन येथे गेले होते. तेथे धीरुभाई अंबानी यांनी गॅस स्टेशनवरील कर्मचारी म्हणून काम केले. त्यानंतर सुएझच्या पूर्वेस असलेल्या ए बेस अँड कॉ. या सर्वात मोठ्या ट्रान्सकॉन्टिनेंटल ट्रेडिंग फर्म कंपनीत लिपिक म्हणून काम पाहिले.
त्या दिवसांमध्ये अॅडन हे जगातील दुसरे सर्वात व्यस्त व्यापाऱ्यांचे आणि तेल व्यावसायाचे बंदर होते. ए बेसे अँड कॉ. येथे असताना धीरुभाई अंबानी यांनी कमोडिटी ट्रेडिंग, हाय सीझ खरेदी व विक्री, विपणन व वितरण, चलन व्यापार आणि पैशाचे व्यवस्थापन शिकून घेतले. बेसेमध्ये असताना त्यांनी युरोप, आफ्रिका, भारत, जपान आणि चीन या भागांतील व्यापाऱ्यांची भेट घेतली.
व्यापार शिकण्यासाठी एका ट्रेडिंग फर्ममध्ये केले होते विनामूल्य काम
त्यावेळी, जगातील सर्व भागांमधून अॅडन बंदरात माल आणला जात असे आणि वेगवेगळ्या खंडांमध्ये पाठवण्यात येत असे. धीरुभाई अंबानी यांना व्यापार शिकण्याची इच्छा होती पण त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. त्यांनी व्यापार शिकण्यासाठी एका गुजराती ट्रेडिंग फर्मसाठी विनामूल्य काम करण्यास सुरवात केली. तेथे त्यांनी व्यापार, लेखा, बुककीपिंग, शिपिंग पेपर आणि कागदपत्रे तयार करणे आणि बँका आणि विमा कंपन्यांशी व्यवहार करण्याचे काम केले. बेसे ऑफिसमध्ये, त्यांनी टाइपिंग, व्यावसायिक पत्रे तयार करणे आणि कायदेशीर कागदपत्रे तयार करण्याचे कौशल्य सुधारले.
१९६६ मध्ये रिलायन्सचे वस्त्रोद्योगात पाऊल
१९५८ मध्ये, धीरुभाई पुन्हा मुंबईत आले आणि रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनच्या नावाने स्वतः बाजारात उतरले. त्यानंतर त्यांनी तातडीने खाली देय अटींवर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी विविध वस्तूंचे कोटेशन गोळा करुन मुंबईच्या घाऊक मसाल्यांच्या बाजारपेठेत फेऱ्या मारण्यास सुरवात केली. काही वर्षानंतर धीरुभाई बॉम्बे यार्न मर्चंट्स असोसिएशनचे संचालक म्हणून निवडले गेले. साठच्या दशकाच्या रेयान फॅब्रिक्सच्या निर्यातीच्या विरोधात नायलॉन सूत आयात करण्यासाठी शासकीय योजना सुरू केली. त्यांनी आपला स्वतंत्र उत्पादन युनिट स्थापन केला. १९६६ मध्ये त्यांनी रिलायन्सची वस्त्रोद्योग गिरणी स्थापन केली, जी ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीस टेक्सटाईल कंपनी होती.
धीरुभाई अंबानीचे असामन्य कर्तृत्व आणि त्यांना मिळालेले पुरस्कार
– १९८६ मध्ये रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईच्या क्रॉस मैदान येथे आयोजित करण्यात आली होता आणि त्यात ३५,००० हून अधिक भागधारक उपस्थित होते. ही भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील कंपनी होती ज्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही एका स्टेडियममध्ये घेण्यात आली होती.
– १९९८ मध्ये धीरुभाई अंबानी हे एकमेव भारतीय उद्योगपती बनले जे आशियामधील ५० सर्वात सामर्थ्यवान लोकांपैकी एक म्हणून ओळखले गेले. ज्यांचे नाव एशिया विक मॅकझिनमध्ये होते.
– १९९८ मध्ये, देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी उभारण्याच्या कामगिरीबद्दल धीरुभाई अंबानी हे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हर्टन स्कूल डीनचे पदक मिळवणारे पहिले भारतीय होते.
– १९९९ मध्ये, टेलर नेल्सन सॉफ्रेस-मोड (टीएनएस मोड) सर्वेक्षणात धीरुभाई अंबानी ‘इंडियाज मोस्ट अॅडमायर्ड सीईओ’ म्हणून ओळखले गेले.
– २००० मध्ये एफआयसीसीआयने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) येथे झालेल्या एका विशेष समारंभात ‘२० व्या शतकातील भारतीय उद्योजक’ पुरस्कार धीरुभाई अंबानी यांना प्रदान करण्यात आला.
– २००४ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही फॉर्च्यून ग्लोबल ५०० च्या यादीमधील पहिली भारतीय खासगी क्षेत्रातील कंपनी बनली.
– २०१६ मध्ये, धीरुभाई अंबानी यांना त्यांचा व्यापार आणि उद्योगातल्या सेवेबद्दल भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.