Highest Railway Station of India: रेल्वे सेवा हे भारतातील सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. आपल्या देशात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला देशाची लाईफ लाइन म्हणून ओळखले जाते. दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. त्यामुळे भारतातील रेल्वेची जगभर चर्चा आहे. रेल्वे नेटवर्कबाबत तर भारताचा क्रमांक चौथा लागतो. भारतातील अनेक रेल्वेस्थानके अतिशय सुंदर आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला सर्वात मोठे रेल्वेस्थानक आणि सर्वात लहान रेल्वेस्थानकांबद्दल माहिती असेल. पण, तुम्हाला देशातील सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेस्थानकाबद्दल माहिती आहे का? नसेल तर हरकत नाही, कारण आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून आपल्या देशातील सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते आहे, याविषयी माहिती देणार आहोत.

भारतीय रेल्वेबद्दल तुम्ही बरंच काही वाचलं किंवा ऐकलं असेल, पण तुम्हाला माहीत नसेल की, भारतातील सर्वात सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेस्थानक कुठे आहे? देशातील सर्वात जास्त उंचीवरील रेल्वेस्थानक पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग येथे आहे. ‘घूम’ असे या रेल्वेस्थानकाचे नाव आहे. या रेल्वेस्थानकाची उंची दोन हजार २५८ मीटर आहे किंवा असे म्हणता येईल की, हे रेल्वेस्थानक सात हजार ४०७ फूट उंचीवर आहे.

(हे ही वाचा : वाहनचालकांनो, कारच्या मागच्या काचेवर लाल रंगाच्या रेषा का असतात? ‘हे’ आहे यामागील खरं कारण… )

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पूर्वी कोलकाताहून दार्जिलिंगला पोहोचण्यासाठी पाच ते सहा दिवस लागत होते. कारण, येथे पोहोचण्यासाठी प्रवाशांना आधी वाफेच्या इंजिनाने प्रवास करावा लागत होता. यानंतर ते बोटीने गंगा पार करून साहिबगंजला पोहोचायचे. येथे पोहोचल्यानंतर ते बैलगाडी व इतर मार्गाने पुढील प्रवास पूर्ण करायचे. त्यामुळे प्रवाशांना दार्जिलिंगला जाण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत होता.

दार्जिलिंग येथील रेल्वेचे बांधकाम १८७९ मध्ये सुरू झाले. यानंतर १८८१ मध्ये हा रेल्वे मार्ग घमौरला पोहोचला. घूम न्यू जलपाईगुडीहून दार्जिलिंगला जाणारी टॉय ट्रेन घूम स्टेशनवरूनच जाते. या रेल्वे प्रवासादरम्यान अतिशय सुंदर दृश्ये पाहता येतात. रस्त्याच्या मधोमध बांधलेले हे रेल्वेस्थानक देशभरातील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.