Shortest Rail Route of Indian Railways:  भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा भारतीयांसाठी दळणवळणाचा सर्वात मोठा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेक जण रेल्वेला जास्त प्राधान्य देतात. भारतीय रेल्वेचे जाळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आहे. अनेक रेल्वे मार्ग आहेत, जे खूप लांब आहेत. ते पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वे मार्गाबद्दल सांगणार आहोत, जो कदाचित देशातील सर्वात लहान आहे, परंतु तरीही ट्रेन तिथे थांबते आणि विशेष म्हणजे, याचे तिकिट दरही फार जास्त आहे.

खरंतर भारतात अशा काही रेल्वेगाड्या आहेत, ज्या एकाचवेळी तीन हजार किलोमीटरचा प्रवास करतात आणि हा प्रवास करण्यासाठी ७० तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. यात तुम्ही हिमसागर एक्स्प्रेस आणि विवेक एक्स्प्रेसची नावं ऐकली असतील. पण, तुम्हाला माहीत आहे का, भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कोणता आहे? सर्वात लहान रेल्वे मार्गाचे अंतर फक्त तीन किमी आहे.

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Vande Bharat, Tejas,
कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
kalyan railway station crime news,
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

(हे ही वाचा : वाहनचालकांनो, कारच्या मागच्या काचेवर लाल रंगाच्या रेषा का असतात? ‘हे’ आहे यामागील खरं कारण…)

सर्वात लहान भारतीय रेल्वे मार्ग

भारतीय रेल्वेचा हा सर्वात लहान रेल्वे मार्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील नागपूर ते अजनीदरम्यान सर्वात लहान रेल्वे मार्ग आहे. नागपूर आणि अजनी दरम्यानचे एकूण अंतर तीन किलोमीटर आहे. या मार्गावर सुमारे चार-पाच गाड्या धावतात. विशेष म्हणजे, येथे मोठ्या संख्येने लोक तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वे पकडतात. या मार्गावर निवडक ट्रेन धावतात. भारतीय रेल्वे या प्रवासासाठी जनरल क्लासपासून ते स्लीपर क्लास, थर्ड एसी आणि सेकंड एसीचे भाडे आकारते. पण, जर आपण भाड्याबद्दल बोललो, तर तुम्हाला येथे प्रवास करण्यासाठी ३०० किलोमीटरच्या अंतराएवढे पैसे खर्च करावे लागतील.

Ixigo या रेल्वेशी संबंधित ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलनुसार, नागपूर ते अजनीला जाण्यासाठी फक्त नऊ मिनिटे लागतात. बुकिंग वेबसाइट RailYatri नुसार, या प्रवासाचे जनरल तिकीट ६० रुपये आहे आणि स्लीपर क्लाससाठी १७५ रुपये आहे; तर एसी ३ क्लासचा प्रवास ५५५ रुपये, एसी २ चे तिकीट ७६० आणि एसी १ चे तिकीट १,२५५ रुपये इतके आहे.