माणसाच्या आयुष्यात शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. याच शिक्षणात त्याला एक गोष्ट सर्वात जास्त मदत करते आणि ती म्हणजे पेन. पेन आपल्या सर्वांसाठीच उपयोगी वस्तू आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, लिहिण्यासाठी पेन वापरले जातात. शालेय विद्यार्थ्यांना निळ्या शाईच्या पेनाने लिहिण्यास सांगितलं जातं, तर काहीवेळा ते उत्तरांमधून शीर्षक वेगळं करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनाने लिहितात. तुम्हाला आठवत असेल की, शाळेत शिक्षक नेहमी उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल पेनाने लिहायचे. शेरा लाल रंगातच दिला जातो. शाईचे रंग खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही कधी विचार केलाय का, शिक्षक लाल रंगाच्याच पेनाचा वापर का करतात?

शाळेत असताना आपण सर्व काळ्या निळ्या रंगाच्या पेनाने लिहित असू. पण आपले शिक्षक मात्र लिहिण्यासाठी लाल पेनाचाच वापर करत असतं. शाळकरी विद्यार्थ्यांना लाल पेनाने लिहिण्याची परवानगी नसते. शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी काही नियम आहेत. सुरुवातीला मुलांना पेन्सिलने लिहायला शिकवले जाते. मग विशिष्ट वय आणि वर्गानंतर त्यांना निळ्या आणि काळ्या शाईच्या पेनाने लिहिण्याची परवानगी दिली जाते. पण मुले उत्सुक असतात. पेनाच्या रंगाबाबत अनेक प्रश्न त्याच्या मनात डोकावत राहतात.

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

बरं, प्रत्येक मुलाच्या मनात हा विचार असतो की, जगात प्रत्येक रंगाची पेन आहेत. मग त्यांना फक्त निळा आणि काळा वापरण्याची परवानगी का आहे? तर, शिक्षकही त्यांच्यासोबत लाल पेन वापरतात. कदाचित तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. पण खरंतर शिक्षक लाल पेनाचा वापर का करतात? आणि विद्यार्थी निळ्या-काळ्या रंगाच्याच पेनाने का लिहितात यामागे कोणतंही निश्चित कारण नाही. याबाबत अनेक अंदाज बांधले गेले आहेत, त्याच अंदाजानुसार, वेगवेगळ्या अहवालांवर आधारित असलेली माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

(हे ही वाचा : रेल्वेच्या दाराजवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते माहितीये? ‘हे’ आहे यामागील खरं कारण… )

विद्यार्थी निळ्या-काळ्या रंगाच्याच पेनाने का लिहितात?

विद्यार्थी निळ्या-काळ्या पेनाने लिहितात, कारण ही शाई पांढऱ्या कागदावर उठून दिसते. त्यामुळे लिहिलेल्या गोष्टी पटकून दिसून येतात. वास्तविक, हे रंग विरोधाभासी आहेत आणि शब्दांमधील फरक स्पष्टपणे दर्शवतात. लेखनासाठी हलकी शाई वापरली तर शब्द वाचायला अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी निळ्या-काळ्या रंगाच्या पेनाचा वापर जास्त करत असतात.

शिक्षक लाल पेनाचा वापर का करतात?

विद्यार्थ्यांचे लेखन तपासण्यासाठी शिक्षक लाल पेनाचा वापर करतात. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासतात तेव्हा शिक्षक लाल रंगाच्या पेनाने मार्क किंवा शेरा देतात. जेणेकरून विद्यार्थ्यांची उत्तरं आणि शिक्षकांचा शेरा या दोन्ही गोष्टी एकसारखे दिसणार नाहीत आणि शिक्षकांनीही निळ्या किंवा काळ्या रंगाचे पेन वापरल्यास त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसणार नाही, म्हणून शिक्षक लाल पेनाचा वापर करतात.