राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी (२२ जुलै २०२१ रोजी) हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. दुसरीकडे  खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के  भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासलाच नाही तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने धरणं भरु लागली आहेत. मात्र ती क्षमतेपेक्षा अधिक भरल्यानंतर त्यामधील पाणी सोडून देण्यात येतं. अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो त्याप्रमाणे अमुक एका धरणातून इतकं क्युसेक पाणी सोडलं, इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असा उल्लेख दिसतो. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणाऱ्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय यावर टाकलेली नजर…

नक्की वाचा >> समजून घ्या : ढगफुटी म्हणजे काय? ती कशी होते?; जगातील सर्वात मोठी ढगफुटी भारतात कधी, कुठे झालेली?

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

पाणी हे प्रामुख्याने दोन पद्धतीने मोजलं जातं. पहिला प्रकार म्हणजे वॉटर अ‍ॅट रेस्ट म्हणजेच पाणीसाठा आणि दुसरा प्रकार वॉटर इन मोशन म्हणजेच वाहणारं पाणी. यापैकी पाणीसाठा हा जलस्त्रोतांसंदर्भात वापरलं जातं. ज्यामध्ये पाणी तलाव, विहरी, बोरवेलसारख्या गोष्टींचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे नद्यांना असणारं पाणी. सामान्यपणे जलसाठ्यांमधील पाणी मोजण्यासाठी घनफूट (क्युबिक फूट) हे एकक वापरलं जातं. मात्र मोठ्या प्रमाणातील जलसाठा असेल तर तो मोजण्यासाठी वेगळी एककं वापरली जातात. नद्यांमधून वाहणारे पाणी आणि धरणामधील पाणीसाठी मोजण्यासाठी टीएमसी फूट हे एकक वापरलं जातं.

टीएमसी म्हणजे नक्की किती?

एक टीएमसी फूट म्हणजे १०० कोटी घनफूट (क्युबिक फूट). इंग्रजीमधील संख्याशास्त्राप्रमाणे मिलियन हा शब्द वापरतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात पाणी असेल तर त्याला वन थाऊजंड मिलियन क्युबिक फूट असं म्हणतात. यावरुन टीएमसी (Thousand Million Cubic) हे एकक जन्माला आलं. लिटर्समध्ये सांगायचं झालं तर एक टीएमसी फूट म्हणजे २.८३१ x १०,०००,०००,००० लीटर पाणी. सोप्या भाषेत सांगायचं तर २८० हजार कोटी लिटरहून अधिक. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातील खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी एवढी आहे म्हणजे या धरणामध्ये १.९७ गुणीले २.८३१ x १०,०००,०००,००० इतकं पाणी साठवू शकतो. एक घनफूट (क्युबिक फूट) पाणी म्हणजे २८.३२ लिटर होय.

नक्की वाचा >> समजून घ्या : ६० मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती? पाऊस कसा मोजतात?

क्युसेक म्हणजे काय?

क्युसेकबद्दल बोलायचं झाल्यास हे पाण्याचा प्रवाह किती आहे हे मोजण्याचं एकक आहे. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’ तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. एखाद्या धरणातून किंवा बंधार्‍यावरुन एका सेकंदाला किती घनफूट (क्युबिक फूट) किंवा घनमीटर पाणी वाहतं हे या एककाच्या मदतीने समजतं. म्हणजेच वर उल्लेख केला त्याप्रमाणे खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला या वाक्याचा सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाल्यास गुरुवारी दुपारपासून खडकवासला धरणामधून प्रती सेकंदाला १० हजार ९३ घनफूट (क्युबिक फूट) वेगाने पाणी सोडण्यात आलं. म्हणजेच १० हजार क्युसेक्स वेगाने १ टीएमसी पाणी सोडलं असं म्हटल्यास. एका सेकंदाला १० हजार घनफूट पाणी या हिशोबाने १०० कोटी घनफूट पाणी सोडलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : रेड अलर्ट म्हणजे काय?; तो कधी जारी करण्यात येतो?

महाराष्ट्रातील काही मोठी धरणे

उजनी ११७.२७ टीएमसी
कोयना १०५.२७ टीएमसी
जायकवाडी ७६.६५ टीएमसी (पैठण)
पैंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी
पूर्ण येलदरी २८.५६ टीएमसी