भारताची समृद्ध जैवविविधता निःसंशयपणे त्याच्या सर्वांत मोठ्या नैसर्गिक संपत्तींपैकी एक आहे. येथे अद्भुत वन्यजीव आहेत, ज्यामध्ये मोठ्या सिंहापासून आणि दुर्मीळ बेडकापर्यंत असे अनेक अद्वितीय प्राणी आहेत. त्यापैकी काही प्राणी फक्त भारतातच आढळतात. चला तर मग पाहूया असे १० खास प्राणी जे फक्त भारतातच राहतात आणि त्यांना कुठे शोधायचे ते.

१. आशियाई सिंह ( Asiatic Lions)

गुजरातमधील गीर या राष्ट्रीय उद्यानाला आशियाई सिंहांचे घर म्हटले जाते. ते आफ्रिकन सिंहापेक्षा वेगळे असतात. आशियाई सिंहाला मोठी झुपकेदार शेपटी असते आणि त्याच्या पोटावरील त्वचा दुमडलेली असते. तसेच, त्यांच्या डोक्यावर पातळ कुरळे केस असतात.

२. सांगाई हरीण (Sangai Deers)

सांगाई हरीण फक्त मणिपूरच्या केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यानात आढळते. त्यांना तरंगत्या गवताळ प्रदेशातून उडी मारण्याची सवय (फुमडी) असल्याने ते ‘नाचणारे हरीण’ म्हणूनही ओळखले जाते.

३. नीलगिरी तहर (Nilgiri Tahar)

नीलगिरी तहर (निलगिरीट्रागस हायलोक्रियस; पूर्वीचे नाव हेमिट्रागस हायलोक्रियस) हा एक अनगुलेट (Ungulate) प्राणी आहे, जो दक्षिण भारतातील तमिळनाडू व केरळ या राज्यांमधील निलगिरी टेकड्या आणि पश्चिम व पूर्व घाटाच्या दक्षिण भागात आढळतो. नीलगिरीट्रागस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे आणि ती ओव्हिस वंशाच्या मेंढ्यांशी जवळून संबंधित आहे. नीलगिरी तहर हा प्राणी काश्मीर व भूतानमध्ये आढळणाऱ्या हिमालयीन तहर (हेमिट्रागस जेमलाहिकस) आणि ओमान व संयुक्त अरब अमिरातीमध्ये आढळणाऱ्या अरबी तहर (अराबिट्रागस जयकारी) यांचा संगम आहे. नीलगिरी तहर ही पर्वतीय कॅप्रिनीच्या काही प्रजातींपैकी एक आहे. ही तहर एकमेव अशी प्रजाती आहे, जी थंड आणि ओल्या उष्ण कटिबंधीय वातावरणाशी जुळवून घेते.

४. काश्मीर हरीण (Kashmir Stag)

काश्मीरमधील दाचिगम राष्ट्रीय उद्यानात आणि कधी कधी हिमाचल प्रदेशातील उत्तर चंबा जिल्ह्यात हे काश्मिरी हरण. आढळते. या लाल हरणाच्या या उपप्रजातीला हंगुल (Hangul), असेही म्हणतात.

५. पिग्मी हॉग (Pygmy Hog)

आसामच्या मानस राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्यास तुम्हाला जगातील सर्वांत लहान आणि दुर्मीळ वन्य डुकराच्या जवळ जाता येईल. २५० पेक्षा कमी संख्येत असलेले हे प्राणी ओल्या गवताळ प्रदेशात वाढतात आणि सुरुवातीपासूनच छतासह स्वतःचे घर बांधण्यास सक्षम आहेत.

६. निलगिरी ब्ल्यू रॉबिन ( Nilgiri blue robin)

निलगीरी शोलाकिलीस म्हणूनही ओळखले जाणारा हा आश्चर्यकारक गाणारा पक्षी पश्चिम घाटातील शोला जंगलात आणि दक्षिण भारतातील टेकड्यांमध्ये आढळतो. त्याचा चमकदार निळा पिसारा, पोटावरील पांढरे पंख आणि काळी शेपटी हे मुख्य आकर्षण ठरते आहे.

७. गंगा नदीतील डॉल्फिन (Ganges River Dolphin)

आज ३,७५० संख्या असलेले हे डॉल्फिन उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व बिहारच्या काही भागांत आढळतात. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. सिंधू आणि गंगा नदीतील डॉल्फिन दोन्ही जिवंत जीवाश्म मानले जातात. कारण-ती अजूनही अस्तित्वात असलेली सर्वांत प्राचीन डॉल्फिनची प्रजाती आहे.

८. अंदमानमधील जंगली डुक्कर (Andaman Wild Boar)

हा प्राणी गडद केसांचा आणि मजबूत शरीरयष्टीचा आहे, जो अंदमान बेटांच्या घनदाट जंगलात वाढतो. बेटावरील जीवनाशी जुळवून घेतल्यानंतर, तो उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारी मुळे, फळे व लहान अपृष्ठवंशीय प्राणी यांवर स्वतःचा उदरनिर्वाह करतो.

९. जांभळा बेडूक (Purple Frog)

जांभळ्या बेडकाचे शरीर हे फुगलेले, डोके लहान व नाक टोकदार असते. इतरांपेक्षा वेगळा दिसणारा घटक म्हणजे त्याचा रेट्रो जांभळा रंग. पश्चिम घाटात राहणारा हा उभयचर प्राणी त्याचे बहुतेक आयुष्य जमिनीखाली घालवतो, पावसाळ्यात काही दिवसच तो प्रजननासाठी पृष्ठभागावर येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०. निकोबार मेगापोड (Nicobar Megapode)

निकोबार बेटांचा मूळ रहिवासी असलेला आणि जमिनीवर राहणारा हा पक्षी त्याच्या अनोख्या घरट्याच्या वर्तनासाठी ओळखला जातो. शरीराच्या उष्णतेने अंडी उबविण्याऐवजी, तो अंडी उबविण्यासाठी उबदार वाळूमध्ये किंवा कुजलेल्या वनस्पतींमध्ये ती गाडतो.