GPS Full Form: जीपीएस (GPS) हा सध्या एक सामान्य शब्द झाला आहे. जीपीएसशिवाय घरी फूड डिलिव्हरी जलद होणार नाही, वाहने रस्ता चुकतील इतकं आपण GPS वर अवलंबून आहोत. अमेरिकेने विकसित केलेली GPS प्रणाली ही सध्या हातातल्या मोबाइलचा आणि बहुतेक सर्वच वाहनांचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. पण, आपल्या रोजच्या वापरात होणाऱ्या या जीपीएस (GPS) चा फूल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
जीपीएसचा नेमका अर्थ काय आहे? (What GPS Stands For)
जीपीएस म्हणजे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (Global Positioning System). हे एक तंत्रज्ञान आहे, ज्याच्या सहाय्याने लोक उपग्रहांचे सिग्नल वापरून पृथ्वीवरील आपले स्थान कुठेही शोधू शकतात.
हेही वाचा… इ़डलीला इंग्रजीत काय म्हणतात हे माहित आहे का? जाणून घ्या
ते कसे काम करते? (How GPS Works)
जीपीएस २४ उपग्रहांचा वापर करतो, जे पृथ्वीभोवती फिरतात. हे उपग्रह फोन, कार, विमान इत्यादी उपकरणांना सिग्नल पाठवतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे अचूक स्थान समजते.
सर्व प्रकारच्या हवामानात करते कार्य (GPS Works in all Weather)
जीपीएस सर्व प्रकारच्या हवामानात काम करते. तुम्ही जीपीएस सूर्यप्रकाशाच्या दिवसांत, पावसाच्या रात्री किंवा ढगाळ आकाशातही कुठेही वापरू शकता.
हेही वाचा… IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
नेव्हिगेशनसाठी होतो मोठ्या प्रमाणात वापर (Uses in Navigation)
जीपीएस अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. जसे दिशा शोधणे, वाहनांची ट्रॅकिंग करणे आणि जहाजांना समुद्रात नेव्हिगेट करण्यास मदत करणे.
जीपीएसचा वैज्ञानिक वापर (Scientific Uses of GPS)
शास्त्रज्ञदेखील पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी जीपीएस वापरतात, यामुळे त्यांना भूकंप ट्रॅक करणे, पर्वतांची तपासणी करणे आणि पर्यावरणातील बदल मोजण्यास मदत होते.
जीपीएसचा इतिहास (History of GPS)
हे सिस्टम १९७० च्या दशकात प्रथम युनायटेड स्टेट्सच्या लष्करी तुकडीने विकसित केले, पण आता जगभरातील सर्व लोक हे वापरू शकतात.