What Are Spy Balloons: चीनच्या कथित हेरगिरी करणाऱ्या ‘बलून’ला अमेरिकेने हवेतच नष्ट केले आहे. हा बलून उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी भागांवर पाळत ठेवत होता, असा दावा अमेरिकेने केला आहे. यावरून चीन-अमेरिका यांच्यातील राजकीय, व्यापारविषयक संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनने अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेल्या बलूनची मालकी चीनने स्वीकारली आहे. या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधनक करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असेही चीनने सांगितले होते. आत यायचं प्रकरणावरून हेरगिरी करणारा बलून म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, हो ना? चला तर मग आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेरगिरी करणारे फुगे काय आहेत?

हेरगिरी करणारे म्हणजेच गुप्तचर फुगे हे हेरगिरीच्या उपकरणांचा एक प्रकार आहे, हेरगिरी करणारा कॅमेरा हा निर्धारित क्षेत्राच्या वर तरंगणाऱ्या फुग्याच्या खाली लावलेला असतो, वाऱ्याच्या प्रवाहाने हा फुगा वाहून नेला जातो. फुग्यांशी जोडलेल्या उपकरणांमध्ये रडारचा समावेश असू शकतो आणि ते सौरऊर्जेवर चालणारे असू शकतात.

फुगे सामान्यत: २४,००० मीटर – ३७,००० मीटर वर उडतात. साधारणतः नियमित विमाने १२,००० मीटरहुन अधिक उंचीवरून उडत नाहीत. हेरगिरी करणारे फुगे हे या उंचीच्या वरच उड्डाण करतात.

उपग्रहांऐवजी गुप्तचर फुगे का वापरले जातात?

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधील आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि बुद्धिमत्ता अभ्यासाचे प्राध्यापक आणि रिव्हलिंग सिक्रेट्स या पुस्तकाचे लेखक जॉन ब्लॅक्सलँड यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही दशकांपासून, उपग्रह वापरणे हे अनेक प्रश्नांचे उत्तर होते. परंतु आता उपग्रहांना लक्ष्य करण्यासाठी लेझर व समान शस्त्रांचा शोध लावला जात होता. अशावेळी फुग्यांबद्दल संशय येण्याचे प्रमाण कमी असते. ते उपग्रहांप्रमाणेच सातत्यपूर्ण पाळत ठेवत नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून माहितीची पुनर्प्राप्ती करणे सोपे असते. शिवाय हे प्रक्षेपण उपग्रहाच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. अवकाशात उपग्रह पाठवण्‍यासाठी, तुम्‍हाला स्‍पेस लाँचरची आवश्‍यकता असते. उपकरण बनवण्यात सुद्धा साधारणपणे लाखो डॉलर्स खर्च असतो.

२००९ च्या यूएस एअर फोर्सच्या एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या अहवालानुसार. फुगे कमी उंचीवरून अधिक प्रदेश स्कॅन करू शकतात आणि दिलेल्या क्षेत्रावर अधिक वेळ घालवू शकतात कारण ते उपग्रहांपेक्षा अधिक हळू हलतात.

चीनचा कथित ‘Spy Balloon’ अमेरिकेकडून नष्ट

हेरगिरी करणारे फुगे पहिल्यांदा कधी वापरले गेले?

फ्रेंच क्रांतिकारक युद्धांदरम्यान, १७९४ मध्ये ऑस्ट्रियन आणि डच सैन्याविरुद्ध फ्लेरसच्या लढाईत पहिल्यांदा हेरगिरी करणाऱ्या फुग्यांचा वापर झाला होता. १८६० च्या दशकात, अमेरिकन गृहयुद्धादरम्यान देखील वापरले ते गेले होते. गरम हवेच्या फुग्यांना लावलेल्या दुर्बिणीने क्रियाकलापांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासाठी त्यांनी मोर्स कोड वापरला होता. तसेच ‘दगडाला बांधलेल्या कागदाचा तुकडा’ वापरून सिग्नल परत पाठवले जात होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: अयोध्येत आले १४० दशलक्ष वर्ष जुने शाळीग्राम; राम-जानकीच्या मूर्तींसाठी याच शिला का निवडल्या?

क्रेग सिंगलटन, फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रॅसीजचे चीन तज्ञ यांनी रॉयटर्सला सांगितले की शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने अशा फुग्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. अलीकडे यूएसने या कल्पनेला पुनरुज्जीवित केले आहे, पण केवळ यूएसच्या वरील भूभागावर फुगे वापरले जात होते. जर आपल्याला अन्य देशांच्या हवाई हद्दीत असे फुगे उडवण्यासाठी परवानगी आवश्यक असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How spy balloons work america shots hot air balloon by china accusing of spying viral video explained svs
First published on: 05-02-2023 at 13:09 IST