How To Get Immediate Treatment In Moving Train : दूरच्या प्रवासासाठी ट्रेन हे सर्वात महत्वाचं साधन आहे. अनेक लोक ट्रेनने प्रवास करतात. जर तुम्ही लांबच्या प्रवासाला निघालात आणि ट्रेनमध्ये अचानक तुमची तब्येत बिघडली तर काय होईल? मागील काही महिन्यांमध्ये ट्रेनच्या प्रवासात काही प्रवाशांची प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्याने प्रवाशांचं आरोग्य धोक्यात येतं. अशा परिस्थितीत काय करावं? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

अनेकदा उपचार न मिळाल्याने प्रवाशांचा होतो मृत्यू

ट्रेनमध्ये नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. दिवसेंदिवस बदलणाऱ्या हवामानामुळे प्रवाशांचं आरोग्य खराब होण्याची शक्यता वाढते आणि यापासून बचाव करण्यासाठी वेळेवर उपचार होणे खूप गरजेचं असतं. याशिवाय वेळेवर औषधे न मिळाल्याने मृत्यूचा धोकाही संभवतो. प्रवासामध्ये लोकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांची तब्येत बिघडते आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रवाशांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी फॉलो करु शकता.

Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
IIT mumbai, employee suicide,
ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या

नक्की वाचा – शाहरुख खानच्या फिटनेसची आनंद महिंद्रांना पडली भुरळ, व्हिडीओ पाहून म्हणाले, ‘जिंदा बंदा’…५७ वर्षांचा हिरो?

ट्रेनमध्ये तब्येत बिघडल्यावर या गोष्टी करा

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमची तब्येत बिघडल्यावर घाबरून जाऊ नका. तुम्ही तातडीनं रेल्वे हेल्पलाईन नंबर १३८ वर कॉल करा. यामुळे तुमच्या समस्येवर उपाययोजना मिळण्यास मदत होईल.

१) जर १३८ नंबरवर कॉल करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही ९७९४८३४९२४ नंबरवरही कॉल करू शकता.
२) ट्रेनमध्ये तिकिट तपासणीस (TTE) किंना कंडक्टरला लगेच याबाबत माहिती द्या.
३) सर्व ट्रेनमध्ये आता वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील आणि ट्रेनमध्ये असलेल्या डॉक्टरांना संपर्क करून उपचार घेऊ शकता.
४) तुम्ही ट्वीटरवर IRCTC ला टॅग करूनही PNR आणि अन्य माहिती देऊन रेल्वेला तुमच्या परिस्थितीबाबत माहिती देऊ शकता.
५) आधुनिक व्यवस्थेनुसार ट्रेनमध्ये एका वेगळ्या डब्ब्यात डॉक्टरची व्यवस्था असेल. ज्यामुळे तुम्हाला तातडीनं मदतकार्य मिळू शकतं.
६) प्रवाशांच्या मदतीसाठी १६२ ट्रेनमध्ये मेडिकल बॉक्सही लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये ५८ प्रकारची औषधे आणि आवश्यक गोष्टी असतात. यामुळे प्रवाशांना योग्य वेळी उपचार मिळू शकतो.