Farukh Siyar and the British Invasion भारतात मुघलांची झपाट्याने भरभराट झाली, परंतु तितक्याच वेगाने त्यांचे पतनही झाले. बाबरपासून ते औरंगजेबापर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार झपाट्याने झाला. या कालखंडात त्यांनी अनेक प्रकारच्या वास्तूंची निर्मिती केली. या वास्तू त्यांच्या अद्वितीय कलागुणांसाठी ओळखल्या जातात. इतकेच नाही तर मुघल या काळात अतिश्रीमंत झाले. परंतु औरंगजेबानंतरच्या पिढ्या मुघल साम्राज्याचे व्यवस्थापन आणि विस्तार करण्यात अयशस्वी ठरल्या, त्यामुळे त्यांचे पतन झाले. त्यांनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला. फारुखसियार हा देखील अशाच काही मुघल शासकांपैकी एक होता. ज्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे केवळ मुघल साम्राज्यच नाही तरी संपूर्ण भारताचे भविष्य धोक्यात आले. अधिक वाचा: दख्खनमधील 'या' गुलामाने केला होता मुघलांचा पराभव कोण होता फारुखसियार? फारुखसियार हा औरंगजेबाचा नातू होता. जहांदारशहाची हत्या करून त्याने मुघल साम्राज्य हस्तगत केले होते. १७१३ ते १७१९ पर्यंत राज्य करणारा फारुखसियार हा केवळ नावाचा शासक होता. प्रत्यक्षात मुघल साम्राज्याची सूत्रे सय्यद बंधूंच्या हाती होती. सय्यद बंधू हे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या प्रशासनाचा भाग होते. सैय्यद हसन अली खान आणि सय्यद हुसेन अली खान या दोन्ही भावांनी औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्यांचा प्रभाव वाढवला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, या भावांचा प्रभाव अधिकच वाढला. ते स्वतःच शासक असल्याच्या आविर्भावात वावरत होते. त्यांच्याच छत्रछायेखाली फारुखसियार हा मुघल शासक झाला होता. अधिक वाचा: 'या' क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! फारुखसियारचा निर्णय कुठे चुकला? १७१७ मध्ये मुघल शासक फारुखसियारने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली. त्यांना कोणताही कर न लावता व्यवसाय करण्याचे आदेश दिले. या डिक्रीने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये करमुक्त व्यापार वाढविण्याचा परावाना मिळाला. यानंतर कंपनीने मुघल बादशहाला वार्षिक ३,००० रुपये दिले. एक काळ असाही होता जेव्हा फारुखसियार आणि सय्यद बंधूंमध्ये मतभेद निर्माण झाले. दोघांमध्ये विसंवादाची बीजे पेरली गेली. एकमेकांचा पराभव करण्यासाठी ते एकमेकांविरुद्ध कट रचू लागले. १७१९ मध्ये अजित सिंगने सय्यद बंधूंमार्फत लाल किल्ल्यावर हल्ला केला. यामुळे बादशहाला त्याची आई, पत्नी आणि मुलींसह लपून राहावे लागले. त्याच वेळी सय्यद बंधूंच्या विश्वासघातामुळे फारुखसियार सापडला आणि आंधळा झाला. परंतु या दोघांमधील युद्धाचा थेट फायदा ईस्ट इंडिया कंपनीला झाला. त्यांनी हळूहळू संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. एकूणच त्यांनी नंतर भारतावर २०० वर्षे राज्य केले.