scorecardresearch

Indian Railways : रेल्वेने रात्रीचा प्रवास करताना तुम्हाला चुक पडू शकते भारी; जाणून घ्या ‘हे’ नवे नियम

रेल्वेने रात्री १० नंतर प्रवास करताना तुमच्या हिताचे काही नियम तयार केले आहेत, जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

indian railway new rules for night journey in train passengers check latest update
भारतीय रेल्वे (फोटो: File Photo Jansatta)

प्रवाशांना स्वस्तात चांगल्या प्रवासाच्या सुविधा पुरवण्यात आणि कमी वेळात वेगाने एखाद्या ठिकाणी पोहचवण्यात भारतीय रेल्वे आघाडीवर आहे. यामुळे भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सणासुदीच्या काळात तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जातात. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने अनेक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे रात्री रेल्वेने प्रवास करताना तुम्ही रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठी कारवाई होऊ शकते. जाणून घेऊन हे नियम काय आहेत.

रात्री १० वाजल्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये एखादा प्रवासी मोठ्या आवाजात बोलत असेल, गाणी वाजवत असेल किंवा आवाज करत असेल तर त्यावर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते, असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी टीटीई, बोर्डिंग स्टाफ, केटरिंग कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही रेल्वेने केले आहे.

रात्री रेल्वेने प्रवास करताना पाळा ‘हे’ नियम

१) रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये कोणालाही मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलण्यास परवानगी नाही.

२) ट्रेनमध्ये रात्री मोठ्या आवाजात गाणी वाजवता येत नाही.

३) ट्रेनचा दिवा सोडला तर रात्री १० वाजल्यानंतर इतर कोणत्याही लाईट सुरु करण्यास परवानगी नाही.

४) टीटीई रात्री १० वाजल्यानंतर प्रवाशांचे तिकीट तपासू शकत नाही.

५) ग्रुपने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० नंतर जोरात बोलता येणार नाही.

६) रात्री १० वाजल्यानंतर ऑनलाइन फूड वितरित केले जाणार नाही.

७) ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान आणि इतर कोणत्याही अमली पदार्थांच्या सेवनास परवानगी नाही.

८) ट्रेनमधून कोणतेही ज्वलनशील वस्तू, पदार्थ नेण्यास परवानगी नाही.

मिडल बर्थचे नियम

ट्रेनमध्ये रात्री 10 वाजल्यानंतरही जर प्रवासी लोवर बर्थवर बसला असेल, तर त्याला तुम्ही बाजूला हो सांगत मिडल बर्थ उघडू झोपू शकता. प्रवासी मिडल बर्थ रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ओपन ठेवू शकतो. दरम्यान यामुळे कोणत्याही प्रवाश्याला त्रास होता कामा नये.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 16:26 IST