भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेशी निगडित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अद्याप अनेकांना माहीत नाही. रेल्वे ट्रॅकपासून ते ट्रेनपर्यंत असे अनेक साइन बोर्ड्स असतात. ज्यांचा अर्थ बहुतांश लोकांना माहीत नसतो. पण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना त्याचा अर्थ माहित असणे महत्वाचे आहे, कारण त्यात अनेक महत्वाची माहिती दडलेली असते. बर्‍याचदा तुम्ही ट्रॅकच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डवर ‘W/L’ आणि ‘सी/फी’ किंवा ‘H’ लिहिलेले पाहिले असेल. पण तुम्हाला त्यांचा अर्थ माहित आहे का… नाहीतर जाणून घेऊया.

या विविध चिन्हांच्या मदतीने भारतीय रेल्वेचे कामकाज सुरक्षितरित्या होण्यास मदत होते. सोबत प्रवाशांनाही सुखकर प्रवास करता येतो, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तुम्ही छोटे पिवळ्या रंगाचे साईन बोर्ड्सवर काही ना काही लिहिले पाहिले असाल, अनेकदा काहींवर शब्द नसतात तर त्याजागी चिन्ह असतात. पण आज आपण आधी रेल्वे ट्रॅकवर लिहिलेल्या H शब्द असलेल्या चिन्हाबद्दल सांगणार आहोत, हे चिन्ह रेल्वेकडून का वापरले जाते आणि त्याचा अर्थ काय आहे जाणून घेऊ.

W/L आणि सी/फा बोर्डचा अर्थ काय?

हे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पिवळ्या बोर्डवर W/L आणि सी/फा असे लिहिले असते, ज्याला खूप महत्व असते. याचा अर्थ हॉर्न वाजवणे असा होतो. होय, हा बोर्ड रेल्वे क्रॉसिंगसाठी एक हॉर्न सिग्नल आहे. हा बोर्ड सहसा क्रॉसिंगपासून 250 मीटरच्या अंतरावर असतो. त्यावर इंग्रजीमध्ये W/L आणि सी/फा असे हिंदीमध्ये लिहिलेले असते, याचा अर्थ हॉर्न वाजवा, पुढे एक फाटक आहे.

‘H’ चा अर्थ काय?

भारतीय रेल्वेतील ट्रॅकच्या बाजूला वापरल्या जाणार्‍या शब्दांमध्ये ‘H’ हा शब्द देखील समाविष्ट आहे. हा शब्द लोको पायलटसाठी वापरला जातो. रेल्वेमध्ये ‘H’ म्हणजे Halt (थांबा). हे विशेषतः लोकल पॅसेंजर ट्रेनसाठी वापरले जाते. जेव्हा जेव्हा लोको-पायलट पॅसेंजर ट्रेन चालवतात तेव्हा त्या मार्गावर हा शब्द वापरला जातो. हा Halt स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असतो. लोको पायलटला कळते की पुढे थांबा आहे. अशावेळी ट्रेनचा वेग कमी करावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Halt Station म्हणजे काय?

Halt चा शब्दश: अर्थ थांबा असा होतो. गाव किंवा शहरांमध्ये हॉल्ट स्टेशन बनवले जातात. रेल्वेमध्ये हॉल्ट अशा ठिकाणाला म्हणतात जिथे फक्त काही खास गाड्या थांबतात. विशेषतः पॅसेंजर ट्रेन थांबतात. येथे अप आणि डाऊन व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त रेल्वे मार्ग नसतात. अनेकवेळा आपत्कालीन स्थितीत किंवा लाईन क्लिअर नसल्यास एक्स्प्रेस गाड्यांनाही हॉल्ट स्थानकावर थांबवावे लागते.