Marathi Bhasha Gaurav Din : १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला आणि सर्व काही बदललं. आतापर्यंत भारत-पाकमध्ये अनेक युद्ध झाली, तरी काही गोष्टींवरून या दोन्ही देशांतील मतभेद दूर झालेले नाही. या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या देशांचे हितसंबंध परस्पर विरोधी आहेत. त्याला ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक तसेच भूराजकीय कारणे आहेत. भारत-पाक देशांतील सीमांचे आणि इतर मुद्द्यांसंबंधीचे विवाद सोडवणे कठीण आहे. त्यामुळे भारत-पाक मैत्रीविषयी फारसे बोलले जात नाही, पण एकेकाळी हे दोन्ही देश एकत्र नांदायचे. आता आम्ही तुम्हाला सांगितले की पाकिस्तानमध्ये एका शाळेला मराठी माणसाचे नाव आहे, तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे; पण हे खरंय. मराठी भाषा दिनानिमित्त आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

मराठी भाषा दिन

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. भाषा हे संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. मराठी ही आपली मातृभाषा सरळ, सुलभ आणि अतिशय रसाळ आहे. मराठी विषयी संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, “माझ्या मराठीची बोल कौतुके ! परी अमृतातेही पैजासी जिंके !!” म्हणजेच मराठीचे बोल अमृतापेक्षाही मधुर आहेत. मराठी ही भाषा फक्त महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित नसून देशाच्या अनेक राज्यांत आणि देशाबाहेरसुद्धा तितक्याच आवडीने बोलली जाते. मराठी भाषा आणि मराठी माणूस सातासमुद्रापलीकडे लोकांच्या मनावर राज्य करताना दिसतोय. आज आपण अशाच एका मराठी माणसाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या नावाने चक्क पाकिस्तानमध्ये शाळा आहे.

Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..
pashmina, Ladakh
लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

हेही वाचा : “मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण हे फडणवीसांना माहीत नसेल तर..”, संजय राऊत यांची टीका

पाकिस्तानमधील शाळा

पाकिस्तानच्या कराचीमधील पहिल्या सरकारी शाळेस एका मराठी माणसाचे नाव देण्यात आले आहे. या शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’असे आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने हे नाव अजूनही बदलले नाही. तुम्हाला वाटेल, नारायण जगन्नाथ वैद्य हे कोण आहेत आणि यांचे नाव या शाळेला का देण्यात आले? तर जाणून घ्या.

नारायण जगन्नाथ वैद्य कोण?

नारायण जगन्नाथ वैद्य हे ईस्ट इंडिया कंपनीने सिंधमध्ये नेमलेले पहिले डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८६८ मध्ये कंपनीने नारायण वैद्य यांची सिंधी भाषेतील खुदाबादी लिपीतील त्रुटी सुधारण्यासाठी नेमणूक केली. त्यावेळी नारायण वैद्य यांनी अनेक सुधारणा सुचवल्या आणि त्या सुधारणा अमलातदेखील आणण्यात आल्या. त्यांच्या प्रयत्नातून कराची येथे १९६९ मध्ये हिंदू सिंधी शाळा स्थापना झाली. त्यावेळी तेथील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यात आले. जवळपास १२-१५ वर्षे नारायण वैद्य हे कराचीमध्ये होते. या काळात त्यांनी तेथील शिक्षण व्यवस्थेत बऱ्याच सुधारणा केल्या.
पुढे २१ जानेवारी १८७९ मध्ये नारायण वैद्य यांची पुण्याला बदली झाली. शालेय पुस्तकांची तपासणी करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या एका समितीवर त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून त्यांची म्हैसूर येथे बदली झाली. १८७४ मध्ये मुंबई विद्यापीठाचे ते सिनेट सदस्यही राहिले.

१८७४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन’च्या अहवालात असे लक्षात येते की, वैद्य यांच्या प्रयत्नामुळे कराचीमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारली. त्यांनी परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले. २२ मार्च १८८४ रोजी मुंबईत सेवाकाळातच ज्वरामुळे त्यांचा मृत्यू झाला. राईस नारायण वैद्यांच्या मृत्यूलेखात लिहितात, ‘रावसाहेब नारायण जगन्नाथ वैद्य यांनी अनेक वर्षे सिंध प्रांतातील शैक्षणिक सुधारणांकरिता अथक प्रयत्न केले, याबद्दल त्यांचे नाव प्रदीर्घ काळ लक्षात राहील’ आणि याच कारणामुळे कराची येथील पहिल्या सरकारी शाळेस ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल असे नाव देण्यात आले. पुढे त्यांच्या नातवाच्या विनंतीवरून या शाळेचे नाव ‘ नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल असे केले गेले. आज ही शाळा पाकिस्तानच्या कराचीमध्ये एन. जे. व्ही. (नारायण जगन्नाथ वैद्य) या नावाने ओळखली जाते.

संदर्भ –  कराचीस्थित नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल – डॉ. रूपाली मोकाशी (लोकसत्ता)