Dubai Police Supercars पोलिसांकडे कोणती गाडी असते? भारतात कोणाला प्रश्न विचारला तर एक-दोन गाड्यांची नावे मनात येतील. ज्यामध्ये मारुतीची जिप्सी पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, आता भारतात पोलिसांच्या गाड्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत. आता अनेक राज्य सरकारांनी चांगल्या गाड्या दिल्या आहेत. पण संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहराचे पोलिस कोणती कार वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का?

दुबई पोलीसांचे वेगवेगळ्या गाड्यांमधील व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. भारतातील अब्जाधीशांकडे ज्या गाड्या आहेत, त्या गाड्यांमधून दुबई पोलिस दुबईत गस्त घालतात. मर्सिडीज की लॅम्बोर्गिनी? दुबईत पोलिस कोणत्या गाड्या वापरतात? तुम्हाला माहितीये का? आता तुम्ही म्हणाल काय…गस्त घालण्यासाठी एवढ्या आलिशान गाड्या तर हो याच लक्झरी गाड्यांमधून दुबई पोलिस दुबईत गस्त घालतात.

दुबई जगातील सर्वात श्रींमत शहरापैंकी एक आहे. येथील पोलिसही तेवढेच श्रींमत आहे. दुबईत कायदे खूप कडक आहे, तिथे भारतापेक्षा बरेच कडक कायदे आहेत. त्यामुळे तिथले लोक गुन्हे करण्यापूर्वी १०० वेळा विचार करतात. दुबईत गुन्हा केल्यास अनेक कठोर शिक्षा आहेत. दुबईचे पोलिसही भारतातील सामान्य पोलिसांपेक्षा बरेच वेगळे आहेत. भारतात, सामान्य पोलिस पेट्रोलिंग कार म्हणजे महिंद्रा स्कॉर्पिओ किंवा मारुती जिप्सी वापरतात. तर दुबई पोलीस पेट्रोलिंगसाठी मर्सिडीजसारख्या महागड्या वाहनांचा वापर करतात. केवळ मर्सिडीजच नाही तर दुबई पोलिसांच्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्व महागड्या गाड्या आहेत.

जगातील सर्वात वेगवान कार

जगातील सर्वात वेगवान कार म्हणजेच बुगाटी. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत सुमारे १४ कोटी रुपये असलेल्या बुगाटी वेरॉनचाही दुबई पोलिसांच्या पथकात समावेश आहे. बुगाटी कार ताशी ४०८ किमी वेगाने रस्त्यावर धावू शकते. रिपोर्ट्सनुसार, दुबई पोलिसांकडे जगभरातील १४ सुपरकार आहेत. ज्यामध्ये लॅम्बोर्गिनी, एस्टन मार्टिन G7 सारख्या सुपरकार्सचा समावेश आहे. दुबई पोलिसांचे नाव यापूर्वीच गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डमध्‍ये नोंदवले गेले आहे.

हेही वाचा >> लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांशी कनेक्‍ट आणि फ्रेंडली होण्‍यासाठी अशा कारची आवश्‍यकत आहे, असे दुबई पोलिसांचे म्‍हणणे आहे.