Mumbai-Pune Expressway: तुम्ही द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरून प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की, प्रत्येक द्रुतगती मार्गावर टोल स्वरूपात कर भरावा लागतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. रस्ते वाहतुकीच्या पायाभूत सेवा-सुविधांसाठी हा ‘टोल’ वसूल केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, देशातील सर्वांत महागडा द्रुतगती मार्ग कोणता आहे? ज्यावरून प्रवास करण्यासाठी कारचालकाला इतर द्रुतगती मार्गांपेक्षा प्रति किलोमीटर सुमारे एक रुपयापेक्षा जास्त रक्कम ‘टोल’साठी मोजावी लागते. आणखी एक गोष्ट म्हणजे २२ वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा द्रुतगती मार्ग देशातील सर्वांत जुना मानला जातो.

हा द्रुतगती मार्ग दुसरीकडे कुठे नाही, तर चक्क महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वांत जुना आणि पहिला द्रुतगती मार्ग मानला जातो. २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हा एक्सप्रेस वे बांधला होता. हा द्रुतगती मार्ग मुंबईला पुण्याला जोडतो, जे महाराष्ट्रातील सर्वांत व्यग्र शहरांपैकी एक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा देशातील पहिला सहा मार्गिकांचा द्रुतगती मार्गदेखील आहे. (Mumbai-pune Expressway India Most Expensive National Highway)

Read More Stories On Trending : नदी पार करण्यासाठी पूल नाही! विद्यार्थ्यांचा शाळेसाठी भरपावसात जीवघेणा प्रवास; Viral Video नेमका कुठला? वाचा सत्य…

सुमारे १६.३ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या देशातील या पहिल्या द्रुतगती मार्गाची लांबी फक्त ९४.५ किलोमीटर आहे. हा रस्ता नवी मुंबईतील कळंबोली भागातून सुरू होऊन पुण्यातील किवळे येथे संपतो. हा द्रुतगती मार्ग NHAI ने नाही, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला आहे. या द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन मार्गिकांच्या काँक्रीट सर्व्हिस मार्गिकाही बांधण्यात आल्या आहेत.

प्रवास वेळेत दोन तासांची बचत (Most Expensive National Highway In Maharashtra)

हा द्रुतगती मार्ग सुरू झाल्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ तीन तासांवरून केवळ एक तासावर आला आहे. याचा अर्थ असा आहे की, चालक दोन तासांचा वेळ वाचवू शकतात. या द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरांमधील दैनंदिन प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सह्याद्री पर्वत रांगा ओलांडणाऱ्या या द्रुतगती मार्गाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. या सह्याद्रीच्या रांगांमधील रस्त्यावरून जाण्यासाठी बोगदे आणि अंडरपास बांधण्यात आले आहेत. द्रुतगती मार्गाचा वेग ताशी १०० किलोमीटर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किती ‘टोल’ कर भरावा लागतो? (Mumbai-Pune Expressway Toll)

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर एका कारसाठी ३३६ रुपये ‘टोल’ भरावा लागतो. या दृष्टिकोनातून पाहिले, तर या द्रुतगती मार्गावर प्रति किलोमीटर टोल ३.४० रुपये आहे. देशातील इतर द्रुतगती मार्गांचे सरासरी ‘टोल’ कर पाहिल्यास तो सुमारे २.४० रुपये प्रति किलोमीटर आहे. त्यामुळे मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक किलोमीटरसाठी एक रुपयापेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. (Mumbai-Pune Expressway Toll Costs)