Republic Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्यावर ध्वज फडकवतात. पण २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी ते ध्वज फडकवत नाहीत. या दिवशी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. पण पंतप्रधान मोदी २६ जानेवारीला ध्वज का फडकवत नाहीत, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर यामागचे नेमके कारण कारण काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारत यावेळी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा दिवस २६ जानेवारी १९५० रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. १९५० च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी राजधानी दिल्लीत एक विशाल परेड आयोजित केली जाते आणि संविधान प्रमुख राष्ट्रपती यावेळी ध्वजारोहण करतात.

( हे ही वाचा: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायचाय? तर जाणून घ्या संबंधित विषय आणि सविस्तर मांडणी)

पंतप्रधान मोदी तिरंगा का फडकवत नाहीत?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संविधान नसल्याने भारताचे प्रमुख पंतप्रधान होते. या दिवशी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले. तेव्हापासून १५ ऑगस्टला पंतप्रधान नेहमी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. तसंच डॉ. राजेंद्र प्रसाद २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपती बनले होते आणि राष्ट्रपतींना देशाचा प्रथम नागरिक मानले जाते. त्यामुळेच तेव्हापासून आजपर्यंत २६ जानेवारीला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात.

( हे ही वाचा: Republic Day 2023: WhatsApp वर असे डाउनलोड करा प्रजासत्ताक दिनाचे स्टिकर्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण मध्ये अंतर

भारतात २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन खास दिवशी तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात काय फरक आहे ते जाणून घेऊया. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज तळापासून दोरीने ओढला जातो आणि वर घेतला जातो, नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, ध्वज वर बांधला जातो, जो उघडून फडकवला जातो संविधानात याला Flag Unfurling म्हणतात.