Youth Special Allowance For Party : तरुण पिढी ही प्रत्येक देशाची ताकद असते. देशातील तरुण सुशिक्षित झाले तर देशाची प्रगती निश्चित असते. मात्र हा तरुण वर्गच भरकटत गेला तर देशाचे भवितव्य अंधारात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यासाठी देशातील तरुणाई खंबीर राहवी म्हणून प्रयत्न केले जातात. प्रत्येक देशात तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. तरुणांना रोजगार आणि बरोजगारी भत्ता देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. यामागचा उद्देश तरुणांना प्रेरित करणे हा आहे. पण सध्या दक्षिण कोरियाच्या सरकारला एका वेगळ्याच समस्येला सामना करावा लागत आहेत.
दक्षिण कोरिया बहुतांश तरुण वर्ग डिप्रेशनचा सामना करत आहे. यामुळे दक्षिण कोरिया सरकारने या वाढत्या समस्येपासून देशातील तरुणाईला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक तरुणाला दरमहा सुमारे ४० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र हा पैसा या तरुणांना फक्त पार्टी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तुम्हाला हे ऐकून खोट वाटत असेल पण या देशातील तरुणांना पार्टी करण्यासाठी सरकार ४० हजार रुपये देणार आहे. देशाच्या मिनिस्ट्री ऑफ जेंडर इक्वलिटी अँड फॅमिली मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. देशातील तरुणांसाठी इतरही अनेक योजना आखल्या आहेत.
Video : मेट्रोमध्ये बसण्यास सीट मिळत नसल्याने तरुणाने लढवली नामी शक्कल; आता रोज करतो आरामात प्रवास
द गार्डियनच्या बातमीनुसार, दक्षिण कोरियातील बहुतांश तरुण डिप्रेशनचे शिकार होत आहेत. कोरिया इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड सोशल अफेअर्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियामध्ये १९ ते ३९ वयोगटातील ३५०००० लोक अविवाहित आहेत किंवा एकाकीपणाशी झुंज देत आहेत. मात्र या नव्या योजनेअंतर्गत अशा तरुणांना घराबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरुणाईला या बहाण्याने घराबाहेर पडतील आणि पार्टी करुन आपला मूड फ्रेश करतील, ही योजना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच बनवण्यात आली होती. आता हे पैसे तरुणांना दिले जाणार आहेत.
दक्षिण कोरिया हा जगात प्लास्टिक सर्जरीसाठी ओळखला जाणारा देश आहे. याशिवाय येथील तंत्रज्ञानही जगात प्रसिद्ध आहे. मात्र या देशातील तरुण पिढीचे जीवन अतिशय निराश, हताश होत चालले आहे. अशा परिस्थितीत तरुणाईच्या जीवनात आनंद आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय तरुणाईला अनेक प्रकारचे भत्ते देण्याची सरकारची तयारी आहे. यात तरुणांना लूक सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया, बॉडी फिट ठेवण्यासाठी जिमचे सामान देण्याची तयारी सरकारने केली आहे ज्यामुळे प्रत्येक तरुणाला आत्मविश्वासन निर्माण होईल.