O’clock Meaning: घड्याळात वेळ किती झाली, हे सांगण्यासाठी इंग्रजीत O’clock हा शब्द वापरला जातो. ओ’क्लॉकचा अर्थ आहे वाजले. किती वाजले हे सांगण्यासाठी एक ते बारा अंकानंतर ओ’क्लॉक शब्द जोडला जातो. लाखो लोक दर तासाला हा शब्द उच्चारतात. मात्र ओ’क्लॉक मधील ओ या अक्षराचा अर्थ काय? (What’s the meaning of ‘O’ in o’clock?) असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. सोशल मीडियावर हल्लीच अनेकांनी ओ या अक्षराचा नेमका अर्थ काय? यासंबंधी प्रश्न उपस्थित केले. त्यासंदर्भात ‘ओ’चा अर्थ जाणून घेऊ.

मेटा कंपनीच्या थ्रेड्स या सोशल मीडियावर ओ’क्लॉकमधील ‘ओ’ चा अर्थ काय? असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यानंतर या थ्रेडवर अनेकांनी उत्तरे दिली आहेत. ‘ओ’ म्हणजे शून्य, ‘ओ’ म्हणजे ओमेगा किंवा ‘ओ’ म्हणजे ओइडा (वृद्ध व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द) असा अर्थ अनेकांनी काढला. पण ‘ओ’चा खरा अर्थ यापैकी अगदी वेगळा आहे. ओ’क्लॉक मधील ‘ओ’ शब्दाचा अर्थ होतो ‘ऑफ द क्लॉक’.

इतिहासात जेव्हा घड्याळाचा नवीन नवीन शोध लागला, तेव्हा लोक तीन वाजले असे सांगण्यासाठी इंग्रजीत “थ्री ऑफ द क्लॉक” असे म्हणत असत. सुर्याच्या दिशेवरून वेळ सांगण्याच्या पद्धतीहून वेगळी पद्धत म्हणून असे बोलले जात होते. कालांतराने एवढे मोठे वाक्य उच्चारण्याऐवजी फक्त “थ्री ओ’क्लॉक” असे म्हटले जाऊ लागले. “थ्री ओ’क्लॉक” म्हणजे तीन वाजले. ऑफ द या शब्दाचा अपभ्रंश होऊन फक्त ओ’ हे अक्षर वापरले जाऊ लागले.

ओ’क्लॉक शब्दाच्या सविस्तर अर्थाबाबत ब्रिटानिका डिक्शनरीमध्ये उल्लेख आढळतो. किती वाजले हे सांगण्यासाठी ‘ओ’ अक्षरानंतर ॲपोस्ट्रॅाफी (विरामचिन्ह) वापरले जाऊन ऑफ द क्लॉकचे आकुंचन केले गेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

OK शब्दाची उत्पत्तीही अशीच

गमतीचा भाग म्हणजे, किती वाजले हे सांगण्यासाठी ‘ओ’चा अर्थ लपविलेला नाही. तर ओकेमध्येही Okay या शब्दाचे आंकुचन केले गेलेले आहे. मेरियम-वेबस्टर या अमेरिकेतील शब्दकोशानुसार १८२० ते १८३० या दशकात उपरोधिक लेखन करणारे लेखक अडाणी, अशिक्षित व्यक्तिमत्व दाखविण्यासाठी काही शब्दांचा मुद्दामहून चुकीचे लेखन करत असत. जसे की, इंग्रजीतील All Correct या शब्दाला Oll Korrect असे उच्चारानुसार लिहिले जाई. त्याच प्रकारे Okay साठी OK असे लिहिले गेले. त्यानंतर आजतागायत लोकांनी OK हाच शब्द उचलून धरला आहे. तसेच त्याला सर्वमान्यताही मिळाली आहे.