जगातील बहुतांश देशांमध्ये तुम्हाला रस्त्या-रस्त्यावर मोठमोठे ट्रॅफिक सिग्नल दिसतात. वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे सिग्नल महत्वाचे असतात. अशात हे ट्राफिक सिग्नल खराब झाले तर रस्त्यावर बराच काळ ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक देशांमध्ये मोठ्या रस्त्यांवर ट्रॅफिक सिग्नल पाहायला मिळतात. मात्र जगात असा एक देश आहे जिथे तुम्हाला एकही ट्रॅफिक सिग्नल दिसणार नाही. अगदी भारताशेजारील हा देश ट्रॅफिकच्या समस्येपासून मुक्त आहे. त्यामुळे हा कोणता देश आहे जाणून घेऊ…
‘या’ देशात ट्रॅफिक सिग्नलशिवाय धावतात गाड्या
एकही ट्रॅफिक सिग्नल नसलेल्या या देशाचे नाव आहे भूतान. भूतान हा दक्षिण- पूर्व आशियातील पूर्व हिमालमयात वसलेला एक सुंदर देश आहे. भूतानचा लँड ऑफ द थर्ड ड्रॅगन म्हणूनही ओळखले जाते. या देशाबद्दल अनेक रंजक गोष्टी अनेकदा समोर येतात. येथील रस्ते देखील अनेकदा चर्चेच असतात. येथे एक असा रस्ता आहे जो इथल्या अनेक रस्त्यांना जोडलेला आहे.
रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलविना कशा धावतात गाड्या?
भूतानमध्ये तुम्हाला एकही ट्रॅफिक सिग्नल दिसणार नाही. कारण भूतानमधील पर्वतांमध्ये गाडी चालवणे एखाद्या साहसापेक्षा कमी नाही. येथील रस्त्यांवर तुम्हाला गाई-म्हशींसारख्या प्राण्यांचे कळप तुम्हाला मुक्तपणे फिरताना दिसतील. याशिवाय येथील लोक रस्त्यावर थांबून एकमेकांना शुभेच्छा देऊ लागतात. याशिवाय भूतानमध्ये वाहने अगदी सावकाश चालवली जातात ज्यामुळे चालकही काळजीपूर्वक वाहने चालवतात . त्यामुळे तिथे ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता नाही.
इथे ट्रॅफिकची समस्या नाही
भूतानमध्ये ट्रॅफिक सिग्नल नसले तरी येथे ट्राफिक जामची समस्याही नाही. याचे कारण म्हणजे येथील रस्त्यांची रचना अशी आहे की त्यामुळे ट्राफिक जामची समस्या टाळता येते. या देशात तुम्हाला प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस उभे असलेले दिसतात, जे वाहतूक व्यवस्थापित करतात आणि त्यामुळे सहसा रस्ते जाम होत नाही.
जगातील एकमेव कार्बनमुक्त देश
भूतानमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे या देश CO2 च्या उत्पादनापेक्षा कितीतरी पट जास्त CO2 बाहेर टाकतो. तेथील हिरवळ, दाट जंगलांमुळे भूतान कार्बन सिंक म्हणून काम करतो.