scorecardresearch

‘हे’ आहे जगातील सर्वात महाग कापड; किंमत वाचून तुम्हालाही फुटेल घाम

जगातील सर्वात महाग फॅब्रिक असलेल्या विकुनाच्या किंमतीचा अंदाज तुम्ही त्यापासून बनवलेल्या कपड्यांच्या किंमतीवरून लावू शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या फॅब्रिकपासून बनवलेल्या मोज्यांची किंमत..

world most expensive fabric
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

तुम्ही तुमच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त महागड्या कपड्यांबद्दल नक्कीच ऐकलं असेल, पाहिलं असेल आणि कदाचित ते परिधान केले असतील. बरेच कपडे महाग असतात कारण ते ज्या ब्रँडचे असतात त्याची किंमत खूप जास्त असते. तसच काही कपडे खूप महाग असतात कारण ते कपडे दागिन्यांसह भरतकाम केलेले असतात. पण असे देखील अनेक कपडे आहेत ज्यांची महागाई त्यांच्या फॅब्रिकमुळे आहे. असेच एक फॅब्रिक आहे विकुना… या फॅब्रिकला जगातील सर्वात महागडे फॅब्रिक म्हटले जाते. त्याची किंमत एवढी जास्त आहे की त्यापासून बनवलेले मोजे खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमची कार विकावी लागेल.

हे फॅब्रिक किती महाग आहे?

जगातील सर्वात महाग फॅब्रिक असलेल्या विकुनाच्या किंमतीचा अंदाज तुम्ही त्यापासून बनवलेल्या कपड्यांच्या किंमतीवरून लावू शकता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या फॅब्रिकपासून बनवलेल्या मोज्यांची किंमत ८०,००० पासून सुरू होते. म्हणजेच या फॅब्रिकचा टी-शर्ट घ्यायचा असेल तर लाखो रुपये मोजावे लागतील.

‘या’ इटालियन वेबसाइटवर कपडे उपलब्ध आहेत

विकुना फॅब्रिकपासून बनवलेले कपडे लोरो पियाना या इटालियन कंपनी लोरो पियानाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. येथे मोज्यांच्या जोडीची किंमत ८०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. तर तिथे एका शर्टची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तर पोलो नेक टी-शर्ट या वेबसाइटवर ९ लाखांहून अधिक किमतीत उपलब्ध असेल. या फॅब्रिकपासून बनवलेल्या पेंटची किंमत ८ लाखांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, तुम्हाला कोट खरेदी करायचा असेल तर तो ११ लाख रुपयांच्या वर मिळेल.

( हे ही वाचा: ट्रेन दिवसाच्या तुलनेने रात्री वेगात का धावते? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

हे फॅब्रिक इतके महाग का आहे?

विकुना फॅब्रिकची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे ते उंटाच्या केसांपासून बनवले जाते. ज्या लोकरपासून ते तयार केले जाते ते सामान्य उंट नसून उंटाची एक अतिशय खास प्रजाती आहे, जी केवळ दक्षिण अमेरिकेतील विशिष्ट भागात आढळते. हे उंट झपाट्याने नामशेष होत आहेत. १९६० मध्ये त्यांना दुर्मिळ प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर ते पाळणाऱ्यांसाठी नियम खूप कडक करण्यात आले. या उंटातून बाहेर पडणारी जाडी १२ ते १४ मायक्रॉन असते. हे फॅब्रिक इतके उबदार आहे की जर तुम्ही खूप थंड हिवाळ्यात त्यापासून बनवलेले जाकीट घातले तर थंडी तुम्हाला स्पर्शही करणार नाही. या फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांची किंमत जास्त असण्याचे एक कारण म्हणजे विकुना लोकरपासून कोट बनवल्यास सुमारे ३५ उंटांची लोकर काढावी लागते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 18:24 IST